Varun Sardesai: “आरोप सिद्ध करून दाखवा, नाहीतर...”; वरूण सरदेसाईंचा आमदार नितेश राणेंना इशारा

By प्रविण मरगळे | Published: March 15, 2021 06:57 PM2021-03-15T18:57:36+5:302021-03-15T19:03:07+5:30

Varun Sardesai Warning to BJP Nitesh Rane: गेल्या ६ महिन्यापासून राणे कुटुंबाच्या पत्रकार परिषदा पाहिल्या तर त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही, परंतु आज त्यांनी माझ्यावर वैयक्तिक जे आरोप केलेत, ते खोटे आहेत, त्यात काहीही तथ्य नाहीत

Sachin Vaze: "Prove the allegations Varun Sardesai Challenge to BJP MLA Nitesh Rane | Varun Sardesai: “आरोप सिद्ध करून दाखवा, नाहीतर...”; वरूण सरदेसाईंचा आमदार नितेश राणेंना इशारा

Varun Sardesai: “आरोप सिद्ध करून दाखवा, नाहीतर...”; वरूण सरदेसाईंचा आमदार नितेश राणेंना इशारा

Next
ठळक मुद्देजर पुरावे असतील तर कोणत्याही तपास यंत्रणेकडे ते पुरावे द्यावेत, नाहीतर कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं.माझा सचिन वाझे प्रकरणाशी काहीही संबंध नाहीसंपूर्ण राणे कुटुंबियांना बेछुट आरोप करायची एक सवयच लागली आहे

मुंबई – पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली आहे, या अटकेनंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणात थेट युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप लावले होते, या आरोपांवर पत्रकार परिषद घेत वरूण सरदेसाईंनी आरोप सिद्ध करून दाखवा, नाहीतर या विरोधात मी क्रिमिनल अब्रु नुकसानीचा दावा मी करणार आहे असं त्यांनी सांगितले आहे.( Varun Sardesai given reply to BJP MLA Nitesh Rane Allegations of Sachin Vaze Case)

याबाबत वरूण सरदेसाई म्हणाले की, गेल्या ६ महिन्यापासून राणे कुटुंबाच्या पत्रकार परिषदा पाहिल्या तर त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही, परंतु आज त्यांनी माझ्यावर वैयक्तिक जे आरोप केलेत, ते खोटे आहेत, त्यात काहीही तथ्य नाहीत. जर पुरावे असतील तर कोणत्याही तपास यंत्रणेकडे ते पुरावे द्यावेत, नाहीतर कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं. माझा सचिन वाझे प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं त्यांनी सांगितलं आहे.

राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा डाव

मी एका अतिशय सुसंस्कृत उच्चशिक्षित कुटुंबातून येतो व मला कुठेतरी राजकारणाची आवड आहे म्हणून मी युवासेनेचे शिवसेनेचं काम करतो पण आज माझ्यावर घाणेरडे आरोप केलेत, असली काम करायला माझी कोणतीही इच्छा नाही आणि माझ्या हातून तसं घडणार नाही. मी माझ्या कुटुंबाची संपूर्ण पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्या राणे कुटुंबाची पार्श्वभूमी ही मला वाटतं सर्वश्रुत आहे मग ती सुरुवातीची गॅंग असो वा नंतर नंतर त्यांच्यावर असंख्य अति सिरीयस क्राईम म्हणजे मर्डर असेल, किडनॅपिंग असेल, एक्सटोर्शन असेल असे वेगवेगळे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. त्याच्या कुटुंबीयांवर दाखल आहेत व या सगळ्याचा पाढा हा आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेत मांडला आहे. त्यामुळे ते तसं रेकॉर्डवर देखील आहे असा टोला वरुण सरदेसाईंनी नितेश राणेंना(BJP Nitesh Rane) लगावला.

त्याचसोबत कोणी कोणावर कसले आरोप करावेत हा खूप मोठा प्रश्न आहे तसं तर संपूर्ण राणे कुटुंबियांना बेछुट आरोप करायची एक सवयच लागली आहे. ज्या वेळेला ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा असेच आरोप त्यांनी भाजपाच्या नेत्यांवर केले, आता ते भाजपामध्ये गेले तेव्हा महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर करत आहेत. गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरित्या आरोप करत आहेत, खरंतर या संपूर्ण राणे कुटुंबियांना महाराष्ट्रातील जनता आता आजिबात गांभीर्याने घेत नाही, त्याला भीक घालत नाही त्यांची जेव्हा कधी प्रेस कॉन्फरन्स होते किंवा त्यांची जेव्हा कधी एखादी स्टेटमेंट येते आणि तुमच्या माध्यमातून जेव्हा ती टीव्हीवर किंवा सोशल मीडिया दाखवली जाते त्याच्या खालचे जर तुम्ही कॉमेंट्स वाचले तर तुम्हाला कळेल की महाराष्ट्राची जनता त्यांना किती गांभीर्याने घेते असं सगळं जरी असलं तरी आज दुपारी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर अतिशय खोटेनाटे आरोप केले आहेत, माझं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप वरूण सरदेसाई यांनी केला आहे.

ही माझी पार्श्वभूमी – वरूण सरदेसाई

युवासेनेचा सचिव म्हणून मला ओळखता, पण त्याच्या आधीची मी माझी थोडीशी पार्श्वभूमी आज आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात सांगू इच्छितो, दहावीमध्ये मला ९१ टक्के मिळाले बारावी मध्ये मला डिस्टिंक्शन मिळालं त्यानंतर मुंबई विद्यापीठात डिस्टिंक्शनने मी सिविल इंजीनियरिंगची पदवी मिळवली. त्यानंतर ज्या विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले अशा जगातील सुप्रसिद्ध न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात मी मास्टर्स इन सिविल इंजीनियरिंगची पदवी मिळवली, जी पदवी मिळवायला दोन वर्षे लागतात ही पदवी एका वर्षात मिळवली आहे. त्यात मी डिस्टिंक्शन मिळवून परत आलो, माझ्या वडिलांचा व्यवसाय आहे, मी तो व्यवसाय सांभाळतो, मी युवासेनेचं काम करत असताना त्यांच्यासोबत मी व्यवस्थित काम करतो. माझे वडील आज मेकॅनिकल इंजिनिअर आहेत माझे आजोबा हे देखील एमएससी केमिकल होते अशी पार्श्वभूमी वरूण सरदेसाईंनी माध्यमांना सांगितली.

Web Title: Sachin Vaze: "Prove the allegations Varun Sardesai Challenge to BJP MLA Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.