Sachin Vaze : सचिन वाझेंवरील कारवाईबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ही तर केवळ सुरुवात, पुढे, पुढे…”

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 04:01 PM2021-03-14T16:01:36+5:302021-03-14T16:02:46+5:30

Devendra Fadanvis reaction on Sachin Vaze arrest : सचिन वाझेंवरील कारवाईसाठी विधानसभेत आवाज उठवणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Sachin Vaze: Regarding the action against Sachin Vaze, Devendra Fadnavis said, "This is just the beginning" | Sachin Vaze : सचिन वाझेंवरील कारवाईबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ही तर केवळ सुरुवात, पुढे, पुढे…”

Sachin Vaze : सचिन वाझेंवरील कारवाईबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ही तर केवळ सुरुवात, पुढे, पुढे…”

Next

मुंबई - मुंबई पोलीस दलातील एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने अटक केली आहे. या कारवाईमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान, सचिन वाझेंवरील कारवाईसाठी विधानसभेत आवाज उठवणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadanvis reaction on Sachin Vaze arrest ) वाझेंवरील कारवाई ही केवळ सुरुवात आहे, या प्रकरणात अजून माहिती समोर येऊ शकते, अशी शक्यता फडणवीस यांनी वर्तवली आहे. (Regarding the action against Sachin Vaze, Devendra Fadnavis said, "This is just the beginning")

सचिन वाझेंवर झालेल्या अटकेच्या कारवाईप्रकरणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे प्रकरण गंभीर आहे. याबाबत मला जेव्हा पुरावे मिळाले तेव्हा मी ते सभागृहात मांडले. राज्यात सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीसच असे वागू लागले तर कायदा आणि सुव्यवस्था राहील कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणात सचिन वाझेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून झाला. मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझे हा लादेन आहे का असा प्रतिप्रश्न करत वकिली करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या प्ररणात एनआयएला अनेक पुरावे मिळाले आहेत. खरंतर हा या प्रकरणाचा एकच भाग आहे. दुसरा भाग समोर यायचा आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणामध्येही मोठे पुरावे आणि धागेदोरे एनआयएला मिळाले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. मात्र ही कारवाई ही केवळ सुरुवात आहे, असे फडणवीस म्हणाले. 
 
हे प्रकरण केवळ वाझेंपुरते मर्यादित नाही. या प्रकरणात कुणाची काय भूमिका आहे, हेही समोर यायला हवे, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.  दरम्यान, काल अटक करण्यात आलेल्या सचिन वाझे यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी दिली आहे. 
 

Web Title: Sachin Vaze: Regarding the action against Sachin Vaze, Devendra Fadnavis said, "This is just the beginning"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.