Rane vs Shivsena: राणे अन् शिवसेना संघर्ष पेटला; शिवसैनिकांकडून भाजपा कार्यालयात कुत्रे सोडण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 02:09 PM2021-03-16T14:09:50+5:302021-03-16T14:14:13+5:30

Shivsena Workers Agitations against Rane Family over Nitesh Rane Allegations on Varun Sardesai: नाशिकमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत भाजपा कार्यालयासमोर राडा घालण्याचा प्रयत्न केला

Sachin Vaze: Shiv sena Agitations Against Rane Family over Allegations on Varun Sardesai at Nashik | Rane vs Shivsena: राणे अन् शिवसेना संघर्ष पेटला; शिवसैनिकांकडून भाजपा कार्यालयात कुत्रे सोडण्याचा प्रयत्न

Rane vs Shivsena: राणे अन् शिवसेना संघर्ष पेटला; शिवसैनिकांकडून भाजपा कार्यालयात कुत्रे सोडण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देकुत्र्यांच्या गळ्यात बोर्ड लटकावत नितेश राणे, नारायण राणे आणि निलेश राणेंविरोधात घोषणाबाजीवरूण सरदेसाईंवर आमदार नितेश राणेंनी लावला खंडणीचा आरोप आरोप सिद्ध करा, अन्यथा फौजदारी खटल्याला सामोरं जा, वरूण सरदेसाईंचा इशारा

नाशिक – सचिन वाझे प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणेंनी युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप लावले, या आरोपानंतर वरूण सरदेसाई यांनी त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमीवर सांगत राणे कुटुंबावर हल्लाबोल केला, त्याचसोबत जर नितेश राणेंनी आरोप सिद्ध करून दाखवले नाही तर त्यांच्याविरुद्ध अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा दिला होता. या प्रकरणामुळे शिवसेना विरुद्ध राणे असा संघर्ष पुन्हा पेटला आहे.(Clashes between Rane & Shivsena Again over NItesh Rane Allegations on Varun Sardesai in Sachin Vaze Case)  

नाशिकमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत भाजपा कार्यालयासमोर राडा घालण्याचा प्रयत्न केला. यात शिवसैनिकांनी दोन कुत्र्यांच्या गळ्यात बोर्ड लटकावत नितेश राणे, नारायण राणे आणि निलेश राणेंविरोधात घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे काही काळ भाजपा कार्यालयाबाहेर वातावरण तणावपूर्ण झालं होतं, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वेळीच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अडवल्यामुळे पुढील वाद शमला.

“आम्हाला तोंड उघडायला लावलं तर सोनू निगम, रमेश मोरे, चंदू पटेल सगळी प्रकरणं बाहेर काढेन”

ठाकरे कुटुंब आणि त्यांच्या नातेवाईकांना बदनाम करण्याचं षडयंत्र आण घाणेरडे राजकारण भाजपा आणि राणे कुटुंबाकडून होत आहे, ते आम्ही शिवसैनिक कधीही सहन करणार नाही, नितेश राणेंनी ज्याप्रकारे भाजपा कार्यालयातून पत्रकार परिषद घेत आरोप केले, त्यामुळे भाजपा कार्यालयात कुत्रे सोडण्याचं आंदोलन आम्ही केले. जर राणे कुटुंबाने स्वत:ला आवर घातला नाही तर यापेक्षाही खालच्या पातळीवर आंदोलन करू असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

काय म्हणाले होते नितेश राणे?

उद्योगपती अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणी सचिन वाझे यांच्यासोबत युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांचीही चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) करावी, अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली होती. वाझे यांनी आयपीएलमध्ये बेटिंग करणाऱ्या टोळ्यांकडून खंडणी मागितली होती. या खंडणीत सरदेसाई यांनी हिस्सा मागितल्याचा आरोपही राणे यांनी सोमवारी केला. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बेटिंगचे रॅकेट चालते. या सर्व बेटिंगवाल्यांना सचिन वाझे यांनी फोन करून मोठ्या खंडणीची मागणी केली होती. छापा किंवा अटक टाळायची असेल तर १५० कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी वाझेंनी केली होती. वाझेंनी बेटिंगवाल्यांना फोन केल्यानंतर वाझेंना वरुण सरदेसाई यांनी फोन केला. तुम्ही बुकींकडे जे पैसे मागितले त्यातील आमचा हिस्सा किती? असे सरदेसाई यांनी वाझे यांना विचारल्याचा म्हणजे एक प्रकारे खंडणी मागितल्याचा आरोप राणे यांनी केला होता.

राणे कुटुंबावर वरूण सरदेसाईंचा हल्लाबोल

राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरदेसाई यांच्यावर आरोप केले. त्यानंतर सरदेसाई यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन राणे यांचे आरोप फेटाळून लावले. मी एका सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित घरातला आहे. तर, राणे यांच्या कुटुंबाचा इतिहास सर्वश्रुत आहे. राजकीय विरोधकांवर बेछूट आरोप करण्याची त्यांची सवय आहे. नितेश राणे यांनी केलेले सर्व आरोप तथ्यहीन आणि मनाला वेदना देणारे आहेत. त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत अन्यथा फौजदारी स्वरुपाच्या मानहानीच्या खटल्यासाठी तयार रहावे, असा इशारा वरूण सरदेसाई यांनी दिला.

 

Web Title: Sachin Vaze: Shiv sena Agitations Against Rane Family over Allegations on Varun Sardesai at Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.