साध्वीच्या विरोधात प्रचाराला पुरोगामी कार्यकर्त्यांची फौज जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 05:27 AM2019-04-21T05:27:57+5:302019-04-21T07:04:59+5:30

मालेगाव स्फोटातील पीडित, राष्ट्रसेवा दलांचा पुढाकार; भोपाळमध्ये न्या.कोळसे-पाटील, जितेंद्र आव्हाडही जाणार

Sadhvi's campaign will be an army of progressive workers | साध्वीच्या विरोधात प्रचाराला पुरोगामी कार्यकर्त्यांची फौज जाणार

साध्वीच्या विरोधात प्रचाराला पुरोगामी कार्यकर्त्यांची फौज जाणार

Next

मुंबई : शहीद अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधानानंतर साध्वी प्रज्ञासिंह हिने दिलगिरी व्यक्त केली असली, तरी तिच्याविरुद्धचा संताप कमी झालेला नाही. साध्वीच्या विरोधात भोपाळ लोकसभा मतदारसंघात जाऊन प्रचार करण्याचा निर्णय, पुणे, मालेगाव, मुंबईतील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी घेतला आहे.



निवृत्त न्या. बी. जी. कोळसे-पाटील, राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड, राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार, मालेगावातील कुल जमात-ए तंजीमचे अध्यक्ष मौलाना अब्दुल हमीद अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली स्फोटातील मृत्यू पावलेल्यांचे नातेवाईक, जखमी, तसेच कार्यकर्त्यांचे पथक रवाना होईल. बॉम्बस्फोटातील प्रज्ञासिंहचा सहभाग, सहकाऱ्यांसोबत तिने रचलेला कट, करकरे यांच्या नेतृत्वाखालील एटीएसचा तपास, न्यायालयात सादर केलेले आरोपपत्र आणि ‘एनआयए’ने केलेला बदल आदींबाबत सविस्तर माहिती तेथील मतदारांपुढे ठेवली जाणार आहे.
 



करकरे यांनी कसल्याही दबावाला न जुमानता मालेगाव स्फोटातील खºया आरोपींचा छडा लावला होता. राष्टÑविरोधी कृत्य करणाºया साध्वींनी त्यांच्यावर केलेली टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. स्फोटातील पीडितांसह भोपाळमध्ये जाऊन तेथील मतदारांना वास्तवाची जाणीव करून दिली जाईल.
- मौलाना अब्दुल हमीद अन्सारी, अध्यक्ष, कुल जमात-ए-तंजीम, मालेगाव

या निमित्ताने केवळ साध्वीच नव्हे, तर भाजपचे खरे रूप जनतेसमोर मांडले जाईल. भारतीय संस्कृती काय आहे, याबद्दल मतदारांना जाणीव करून देण्यासाठी मी माझ्या पथकासह भोपाळला जाणार आहे. पुरोगामी चळवळीतील जितके कार्यकर्ते येतील, त्यांना सोबत घेऊन भाजपचा बुरखा फाडला जाईल.
- आ. जितेंद्र आव्हाड, राष्टÑवादीचे नेते

साध्वी प्रज्ञासिंह ही खरी दहशतवादी व राष्टÑविरोधी आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर या खटल्याच्या तपासाची दिशा बदलली हे सर्वश्रुत आहे. भोपाळमधील धर्मनिरक्षेप मतदारांना साध्वीच्या देशविरोधी कृत्यांची माहिती पुराव्यानिशी दाखविणार आहोत. शहीद करकरे यांचा अपमान करणाऱ्यांना देशातील जनता कधीच माफ करणार नाही.
-अंजुम इनामदार, अध्यक्ष, मुलनिवासी मुस्लीम मंच, पुणे

Web Title: Sadhvi's campaign will be an army of progressive workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.