“देवाच्या कृपेनं आपले नेताजी पूर्णपणे ठणठणीत”; मुलायम सिंह यादवांच्या धाकट्या सुनेनं सांगितलं

By प्रविण मरगळे | Updated: October 5, 2020 19:44 IST2020-10-05T19:39:59+5:302020-10-05T19:44:42+5:30

Mulayam Singh Yadav News: माजी आमदार मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर नावात साधर्म्य असल्याने अनेकांना माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाल्याचं वाटलं

Samajwadi Party Founder Mulayam Singh Yadav Is Completly Fine Says Aparna Yadav. | “देवाच्या कृपेनं आपले नेताजी पूर्णपणे ठणठणीत”; मुलायम सिंह यादवांच्या धाकट्या सुनेनं सांगितलं

“देवाच्या कृपेनं आपले नेताजी पूर्णपणे ठणठणीत”; मुलायम सिंह यादवांच्या धाकट्या सुनेनं सांगितलं

अलीगड – समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव पूर्णपणे बरे आहेत अशी माहिती त्यांची धाकटी सून अपर्णा यादव यांनी दिली आहे. त्यांनी ट्विट करुन म्हटलंय की, देवाच्या कृपेने आमचे वडील आणि जनतेचे नेताजी चांगले आहेत. रविवारी सपा नेते आणि माजी आमदार मुलायम सिंह यादव यांचे कढोरचा पुरवा गावात निधन झालं, ते समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे निकटवर्तीय होते.

माजी आमदार मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर नावात साधर्म्य असल्याने अनेकांना माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाल्याचं वाटलं, अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली, परंतु त्यांच्या धाकट्या सून अपर्णा यादव यांनी याबाबत ट्विट करत लोकांच्या मनातील संभ्रम दूर केला आहे.

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मुलायम सिंह यादव यांचे निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी औरय्यामधील कढोरचा पुरवा येथे अखेरचा श्वास घेतला आहे. मुलायमसिंह हे तीन वेळा विधान परिषदेवर निवडून गेले होते. तसेच ते दोन वेळा औरय्याच्या विकासखंड भाग्यनगरचे तालुका अध्यक्ष देखील होते. मुलायम सिंह यादव हे समाजवादी पार्टीचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निकटवर्तीय होते.

१९४९ मध्ये ते पहिल्यांदा सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते कायम राजकारणात सक्रिय राहिले. पण, गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणामुळे राजकारणापासून लांब राहिले होते. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मुलायम सिंह यादव यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. आपण मुलायम सिंह यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचं यादव यांनी म्हटलं आहे. "मुलायम सिंह यादव यांनी नेहमीच शेतकरी, गरीब आणि असहाय लोकांसाठी आपला आवाज उठवला. त्यांचे शहरात कोणतेही घर नव्हते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गावात अगदी साधेपणाने घालवले" असं अखिलेश यांनी म्हटलं.

"पक्षाचे कधीही भरून न येणारे नुकसान"

अखिलेश यांनी "मुलायम सिंह यादव हे आयुष्यभर समाजवादी विचारधारेप्रती समर्पित राहिले. त्यांच्या निधनाने पक्षाचं कधीही भरून न येणारं नुकसान झालं आहे" अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे. काही दिवसांपूर्वी मुलायम सिंह आजारी होते. कानपूरमधील एका रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते घरी परतले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण गावात शोक पसरला. मुलायम सिंह यादव यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरापुढे कार्यकर्ते आणि लोकांची गर्दी झाली होती.

Web Title: Samajwadi Party Founder Mulayam Singh Yadav Is Completly Fine Says Aparna Yadav.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.