“मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील”; संजय राठोडांकडून आशा व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 13:50 IST2021-07-19T13:49:29+5:302021-07-19T13:50:31+5:30
माझ्या मंत्रिपदाबाबत विरोधकांनी कितीही विरोध केला तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे संजय राठोड म्हणाले.

“मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील”; संजय राठोडांकडून आशा व्यक्त
जळगाव:पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. पुणे पोलिसांनी या प्रकरणात संजय राठोड यांना क्लीन चिट दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावरून मतमतांतरे असल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राठोड जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना, मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अशी आशा व्यक्त केली आहे. (sanjay rathod says cm uddhav thackeray will take final decision about minister)
केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केल्यानंतर आता राज्यातील ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातही काही बदल केले जाणार असल्याची चर्चा आताच्या घडीला राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून अनेक शक्यताही वर्तवल्या जात आहे. यातच राजीनामा द्यावा लागलेले माजी वनमंत्री संजय राठोड अजूनही मंत्रिमंडळाबाबत आशावादी असल्याचे पाहायला मिळत आहेत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय घेतील, असे राठोड म्हणाले.
“चक्क दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाहीत”; पवारांनी सांगितलं कारण
अंतिम निर्णय मुख्यमंत्री ठाकरेंचा
माझ्या मंत्रिपदाबाबत विरोधकांनी कितीही विरोध केला तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे संजय राठोड म्हणाले. आपल्या समाज्याच्या प्रश्नासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहोत. समाज बांधवांशी चर्चा करीत आहोत. त्यांना काय हवे नको, त्याकडे जातीने लक्ष घालत आहे, असे राठोड यांनी यावेळी नमूद केले. तसेच याबाबत आपण एकदा बोललो आहोत. प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे. योग्य वेळ येईल, तेव्हा मी निश्तितपणे बोलेल, असे संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील क्लीन चिटसंदर्भात बोलताना स्पष्ट केले.
नोकरीची सुवर्ण संधी! TCS, Infosys, Wipro एक लाख कर्मचाऱ्यांची करणार भरती
दरम्यान, राजीनाम्यानंतर काही काळ संजय राठोड राजकीय वर्तुळातून बाहेर होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. पुण्यात मुलीच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेता संजय राठोडला पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिल्याच्या बातम्या येत आहेत तसेच राज्यभरातून फोन ही येत आहेत. या संदर्भात मी स्वत: सकाळी पुणे पोलिस आयुक्तांशी बोलले असता त्यांनी स्वत: या बातमीचे खंडन केलं आहे व यात तथ्य नसल्याचे म्हटलेय, अशी माहिती वाघ यांनी दिली आहे. तसेच पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.