हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंचे नाव घेऊन आरोप करा; संजय राऊतांचे भाजपाला आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 05:42 PM2020-08-10T17:42:50+5:302020-08-10T17:58:58+5:30
सोमवारी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणी कुणीही हवेतल्या गप्पा मारू नये, हिंमत असेल तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन आरोप करा, असे आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला दिले आहे.
सोमवारी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे हे राजकारणातील उभरतं नेतृत्व आहे. त्यांचे खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. पर्यटन आणि पर्यावरण मंत्री म्हणून ते चांगले काम करत आहेत. त्यांचे हे काम अनेकांना खूपत आहे. कोविड सेंटर उभारण्यात त्यांची मोठी कामगिरी आहे. एका चांगल्या नेतृत्वाला हा बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असून हे खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दांत संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावले आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणी कुणीही हवेतल्या गप्पा मारू नये, हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंचे नाव घेऊन आरोप करा. पुरावे घेऊन पुढे या, असे थेट आव्हान संजय राऊत यांनी भाजपाला केले आहे. तसेच, मुंबई पोलीस सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, पहिल्या दिवसांपासून तपासात अडथळे आणले जात आहेत. खोटी माहिती जोडली जात आहे. खोटेपणाची सुरुवात ज्यांनी केली. त्यांनी आता माघार घ्यावी. जे लोक मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्हं उपस्थित करत आहेत. ते लोक आपल्याच राज्याची बदनामी करत आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
याचबरोबर, सुशांत सिंह राजपूत हा महाराष्ट्राचा मुलगा आहे. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणाची आम्हाला काळजी आहे. संवेदना आहे. या महाराष्ट्राच्या मुलाला आम्ही संपूर्ण न्याय देऊ, असे म्हणत संजय राऊत यांनी सीबीआयपेक्षा आधी मुंबई पोलिसांच्या चौकशीचा अहवाल येऊ द्या, असेही ते म्हणाले.
आणखी बातम्या...
...अन् अंधेरी एमआयडीसीत बिबट्या अडकला पिंजऱ्यात
सचिन पायलटांची घरवापसी? राहुल आणि प्रियंका गांधींची घेतली भेट
"वेळीच जागे व्हा; तुम्ही पुतळा हटवला! पण...", छत्रपती संभाजीराजेंचा कर्नाटक सरकारला इशारा