Sanjay Raut: "…तर जळगावात शिवसेनेचा खासदार निवडून येईल’’, संजय राऊत यांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 12:58 PM2021-06-12T12:58:38+5:302021-06-12T12:59:14+5:30
Sanjay Raut in Jalgaon: शिवसेना नेते खासदार संजय राऊत आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांच्या उपस्थितीत जळगाव महानगर शिवसेनेची आढावा बैठक झाली.
जळगाव - शिवसेना नेते खासदार संजय राऊत आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांच्या उपस्थितीत जळगाव महानगर शिवसेनेची आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी शिवसैनिकांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. सत्ता आली म्हणून माजू नका आणि सत्ता गेली म्हणून लाजू नका. जोरात काम केले तर जळगावात आपला खासदार निवडून येईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ( "If we work hard, Shiv Sena MP will be elected in Jalgaon", Sanjay Raut's big statement)
संय राऊत म्हणाले की, पती विरोधी पक्षनेता आणि पत्नी महापौर असा योगायोग असलेली जळगाव महानगरपालिका ही देशातील पहिलीच महानगर पालिका असेल. शिवसैनिकांनो सत्ता आली म्हणून माजू नका आणि सत्ता गेली म्हणून लाजू नका, जोरात काम केलं तर जळगावमध्ये आपला खासदार निवडून येईल. गुलाबराव पाटील यांनी जबाबदारी घेतली की ते पार पाडतात, अशा शब्दात संजय राऊत यांनी यावेळी गुलाबराब पाटील यांचेही कौतुक केले.
संजय राऊत यावेळी म्हणाले की, शिवसेना या चार अक्षरांमध्ये चमत्कार आहे. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेच आपण पुढे जात आहात. जळगावमध्ये सत्तांतर होत असताना ते नगरसेवक कुठून आले, कसे आले, हे आता महत्त्वाचे नाही. आज जळगावच्या सुवर्णनगरीचा कोळसा झाला आहे. ही परिस्थिती सुधारली पाहिजे. जो उत्तम पद्धतीने महानगरपालिका चालवतो तो राज्यही चालवू शकतो. मुंबई मनपानंतर आता उद्धव ठाकरे हे राज्य चालवत आहेत, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.