"राऊत साहेब, आता तुम्हीच शांत राहा, सीबीआय न्याय करेल" सुशांतच्या कुटुंबीयांना सल्ला देण्यावरून भाजपाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 05:17 PM2020-08-13T17:17:39+5:302020-08-13T18:49:02+5:30
Sushant Singh Rajput Suicide Case: सुशांतच्या कुटुंबीयांनी शांत राहावे आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावे, असा सल्ला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिल्यानंतर आता भाजपाकडून राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
नवी दिल्ली - सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून आता शिवसेना आणि भाजपामध्ये थेट आमने-सामनेची लढाई सुरू झाली आहे. त्यात आज सुशांतच्या कुटुंबीयांनी शांत राहावे आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावे, असा सल्ला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिल्यानंतर आता भाजपाकडून राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आता संजय राऊत यांनीच शांत राहावे, सीबीआय न्याय करेल, असा टोला भाजपा नेते शाहनवाझ हुसेन यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना शाहनवाझ हुसेन म्हणाले की, संजय राऊतजी, साहेब न्याय देता देता तुम्ही बराच उशीर केला. आता तुम्ही सांगता की, सुशांत सिंह राजपूतचे कुटुंबीय शांत राहिले तर न्याय मिळेल म्हणून. त्यापेक्षा आता तुम्हीच शांत राहा, सीबीआय न्याय करेल.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी त्याच्या कुटुंबीयांची आग्रही मागणी आहे. त्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुशांतच्या कुटुंबीयांना सल्ला दिला होता. तसेच या प्रकरणावरून शिवसेना कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही असं बोलून राऊतांनी खडसावलं आहे. सुशांत प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस योग्य दिशेने करत आहेत. पुढील तपासासाठी सुशांतच्या कुटुंबियांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांच्या तपासाला सहकार्य करावं. असं देखील संजय राऊत म्हणाले होते.
सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव कुठेही आलेलं नाही, मीडिया नाव घेतेय, मोठा व्यक्तीचं नाव घेतलं की, कोणत्याही प्रकरणाला प्रसिद्धी मिळते. मोठ्या कुटुंबातील व्यक्तींची नाव घेवून सनसनाटी निर्माण केली जाते. तांत्रिक दृष्ट्या हा तपास सीबीआयकडे दाखल केला आह. तो बेकायदेशीर आहे. त्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. राज्यांच्या अधिकारांवर हे अतिक्रमण आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा
केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी