संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट, म्हणाले, “मी निश्चितपणे सांगू शकतो की…”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 08:01 PM2021-05-08T20:01:43+5:302021-05-08T20:05:50+5:30
Sanjay Raut met NCP Chief Sharad Pawar : राज्यातील कोरोनाचे संकट आणि गेल्या काही काळाहीत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे आजारपणातून सावरल्यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सक्रिय झाले आहेत. दरम्यान, शरद पवार यांनी पुन्हा कामाला सुरुवात केल्यानंतर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मुंबईतील सिल्व्हर ओक येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. (Sanjay Raut met NCP Chief Sharad Pawar )राज्यातील कोरोनाचे संकट आणि गेल्या काही काळाहीत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. (Shiv Sena leader Sanjay Raut met NCP Chief Sharad Pawar; said, " I can surely say “Determination - thy name is Sharad Pawar")
संजय राऊत यांनी ट्विट करत या भेटीबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये ते म्हणाले की, आज शरद पवार यांच्यासोबत एक उत्तम भेट झाली. त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांनी नेहमीच्या उत्साहामध्ये विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी शरद पवार यांनी राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार हे उत्तम काम करत असल्याचे सांगितले. या भेटीनंतर मी निश्चितपणे सांगू शकतो की, दृढनिश्चय या शब्दाचे समानअर्थी नाव शरद पवार हे आहे.
Had a wonderful meeting with Shri Sharad Pawar
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 8, 2021
Mr Pawar is in the pink of health and discussed several issues in the same enthusiasm as always. He has also asserted that the MVA govt und is doing an excellent job.
I can surely say “Determination - thy name is Sharad Pawar !" pic.twitter.com/EAaZc3sRqZ
दरम्यान, आजारपणातून सावरल्यानंतर शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये शरद पवार यांनी कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काही घटकांना मदत करण्याची आवश्यकता असल्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे. तसेच कोरोनाकाळात मोठे आर्थिक नुकसान सहन करत असलेल्या छोट्या हॉटेल व्यावसायिकांना मदत मिळणे आवश्यक असल्याचेही शरद पवार यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे.