“RSS ने हिंदुराष्ट्र संकल्पना मांडत मतांसाठी धार्मिक विभाजन केलं, मग आता...”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 04:18 PM2021-07-14T16:18:28+5:302021-07-14T16:21:18+5:30

RSS का बदलतोय, तर त्याकडे प्रयोग म्हणून पाहायला पाहिजे, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

sanjay raut react over rss to start shakas in muslim majority areas in country | “RSS ने हिंदुराष्ट्र संकल्पना मांडत मतांसाठी धार्मिक विभाजन केलं, मग आता...”: संजय राऊत

“RSS ने हिंदुराष्ट्र संकल्पना मांडत मतांसाठी धार्मिक विभाजन केलं, मग आता...”: संजय राऊत

Next
ठळक मुद्देमग आता संघाला परिवर्तन करावंसं का वाटतंय?तर त्याकडे प्रयोग म्हणून पाहायला हवेसंजय राऊत यांनी केली प्रतिक्रिया व्यक्त

मुंबई: कोरोना कालावधीत बंद पडलेले कार्यक्रम आणि शाखा पुन्हा सुरू करण्यावर भर देण्यात येणार असून, आता देशभरातील मुस्लीम भागांमध्ये आपल्या शाखा सुरू करण्याचा निर्णय संघाने घेतल्याचे सांगितले जात आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. संघ का बदलतोय, तर त्याकडे प्रयोग म्हणून पाहायला पाहिजे, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. (sanjay raut react over rss to start shakas in muslim majority areas in country)

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील चित्रकूटमध्ये मागील पाच दिवसांपासून सुरु असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रांत प्रचार बैठक समाप्त झाली. या बैठकीमध्ये संघटनेला मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच काही प्रमाणात खांदेपालट करण्यात आले आहे. यावरून आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

“२०२४ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचे सरकार येणार!”

मग आता संघाला परिवर्तन करावंसं का वाटतंय?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुस्लीम समाजात काम करण्याचे ठरवले आहे. संघ का बदलतोय. आपण आतापर्यंत हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडत आला आहात. मतांसाठी धार्मिक विभाजन करण्यात आले. त्यात हिंदू आणि मुस्लीम समाजाचे अनेक बळी गेले. मात्र, आता परिवर्तन होत असेल आणि देशाच्या अखंडतेला त्यातून बळ मिळाणार असेल, तर त्यासंदर्भात विचार करायला पाहिजे. संघाचे कार्य नक्कीच चांगले आहे. संघाच्या काही भूमिकांवर आम्हीही चर्चा केल्या आहेत. मात्र, संघाला आता स्वतःला बदलावेसे वाटत असेल, तर त्याकडे प्रयोग म्हणून पाहायला हवे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या १२ कोटी कुटुंबांशी RSS संपर्क करणार; IT सेलही होणार सुरू

RSS चा आयटी सेल

संघ संघटना आणखीन मजबूत करण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांपर्यंत संघाचे काम पोहोचवण्यासाठी संघाने आयटी सेल सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. RSS चा आयटी सेल हा भाजपाच्या आयटी सेल पेक्षा वेगळा असेल. तसेच अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातील १२.७० कोटी कुटुंबांनी योगदान दिले आहे. राम मंदिरासाठी एका रुपयाचेही दान दिलेल्या व्यक्तींना वा कुटुंबांशी RSS संपर्क करणार असल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी लवकरच एक अभियान सुरू केले जाणार आहे. 

“भारत एवढा असुरक्षित यापूर्वी कधीच नव्हता”; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

दरम्यान, काँग्रेस पक्ष हा १०० वर्षांहून जुना पक्ष आहे. ऐतिहासिक पक्ष आहे. परंतू आताची परिस्थिती पाहता काँग्रेस काही राज्यांत इतिहासजमा झाला आहे. नाना पटोलेंची वक्तव्ये फारशी चर्चेत नसतात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. 
 

Web Title: sanjay raut react over rss to start shakas in muslim majority areas in country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.