"...या भ्रमात कोणीच राहू नये", परमबीर सिंग यांच्या बदलीनंतर संजय राऊतांचा विरोधकांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 06:04 PM2021-03-17T18:04:47+5:302021-03-17T18:08:31+5:30
sanjay raut : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पाठिशी घातल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात होता.
मुंबई : सचिन वाझे प्रकरणी वादात सापडलेले मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Mumbai Police commissioner Param bir singh) यांची उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे Maharashtras director general Hemant Nagrale) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधत सूचक इशारा देखील दिला आहे. (sanjay raut tweet on the transfer of mumbai police commissioner parambir singh)
संजय राऊत यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. "मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एकाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा", असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एकाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा. @AnilDeshmukhNCP@OfficeofUT
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 17, 2021
दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडल्या प्रकरणी आणि मनसुख हिरेन मृत्यू (mansukh hiren death Case) प्रकरणात मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. त्यामुळे मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पाठिशी घातल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात होता.
तसेच, या सचिन वाझे प्रकरणी परमबीर सिंग यांच्यावर टीका केली जात होती. तसेच, त्यांच्या बदलीची चर्चा देखील सुरू होती. अखेर आज महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. परमबीर सिंग यांना होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.