“माझा विरोध करा, एकत्र राहा, मस्जीदमधून घोषणा ”; केंद्रीय मंत्र्यांचा धक्कादायक आरोप
By प्रविण मरगळे | Published: February 24, 2021 11:47 AM2021-02-24T11:47:51+5:302021-02-24T11:49:37+5:30
Sanjeev Balyan News: समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचे १०-१२ कुटुंब सदस्यांनी माझ्यासोबत हुज्जत घातली, मी त्याठिकाणाहून गेल्यानंतरही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली
मुजफ्फरनगर – उत्तरप्रदेशच्या मुजफ्फरनगरच्या सोरम गावात मंगळवारी भाजपा आणि आरएलडी कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली, या घटनेवर बोलताना केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांनी दावा केलाय की, मस्जीदमधून त्यांच्याविरोधात लोकांना भडकवलं गेले, ही घटना पूर्वनियोजित होती, एका कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री सोरम येथे गेले असता त्याठिकाणी काही युवकांनी त्यांना विरोध केला, तेव्हा भाजपा कार्यकर्ते आणि युवकांमध्ये बाचाबाची झाली.
या बाचाबाचीचं रुपांतर हिंसक झटापटीत झाले, हे सगळं पूर्वनियोजित असल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलं, यामागे समाजवादी पार्टी आणि आरएलडीचा हात आहे. समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचे १०-१२ कुटुंब सदस्यांनी माझ्यासोबत हुज्जत घातली, मी त्याठिकाणाहून गेल्यानंतरही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली, माझ्याविरोधात एकजुट राहण्यासाठी मस्जीदमधून लोकांना आवाहन करण्यात आलं.
जयंत चौधरी यांच्यावर निशाणा
मंगळवारी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. संजीव बालियान यांनी सांगितले की, सोमवारी राजवीर यांच्या एका कार्यक्रमात सहभागी व्हायचे होते, त्यावेळी आरएलडीचे ब्लॉक अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी पोहचून घोषणाबाजी केली, तेव्हा गावकऱ्यांना त्यांना तेथून पळवून लावले, त्यानंतर आरएलडीचे माजी उमेदवार तिथे पोहचले, इतकचं नाही तर बालियान यांनी माजी खासदार अमीर आलम यांच्यावरही निशाणा साधला.
हे सगळं पूर्वनियोजित नाही तर काय आहे? असा प्रश्न बालियान यांनी उपस्थित केला, घटनेच्या काही मिनिटांनंतर आरएलडीचे मोठे नेते तेथे पोहचले, हे लोक लोकांमधील शांतता भंग करण्यासाठी आले होते, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, कॉल डिटेल्स काढून खऱ्या गुन्हेगारांचा बुरखा फाडावा असं बालियान यांनी म्हटलं आहे. याबाबत भाजपाचे जिल्हा प्रभारी डॉक्टर चंद्रमोहन म्हणाले की, काही लोकांनी अराजकतेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, या प्रकरणात तेच लोक दोषी आहेत जे दिल्ली आणि लखनऊ येथे बसून सोशल मीडियावर प्रगट होतात. जनतेसोबत त्यांना देणंघेणं नाही, लाल किल्ल्यावरील हिंसक घटनेत यांचाच हात होता असा थेट आरोप त्यांनी केला.
जनतेत फूट पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न
राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांनी भाजपावर निशाणा साधत ते शेतकरी विरोधी असल्याचं म्हटलं आहे, त्याशिवाय २६ फेब्रुवारीला ते सोरम येथे आरएलडीची महापंचायत रद्द करण्यात येत असून तेथील लोकचं ही पंचायत कधी करायची याचा निर्णय घेतील असं म्हणाले. शिवाय इंग्रजांप्रमाणे भाजपात लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम करत आहे, ज्यापद्धतीने गुंडाद्वारे मारहाण केली गेली ती चुकीची आहे असं त्यांनी म्हटलं,