"महाविकास आघाडीचे सरकार पडणार म्हणणे म्हणजे 'मुंगेरीलाल के हसीन सपने"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 04:42 PM2020-08-15T16:42:30+5:302020-08-15T16:49:05+5:30

आमचे सरकार स्थापन झाले, तेव्हापासून भाजपकडून सरकार पडणार असा दावा केला जात आहे. पण त्याला काही एक अर्थ नाही. महाविकास आघाडीचे सरकार पडणार म्हणजे हे भाजपचे 'मुंगेरीलाल के हसीन सपने' आहेत.

To say that Mahavikas Aghadi government will fall is 'Mungerilal K Haseen Sapne' -Gulabrao Patil attack on BJP | "महाविकास आघाडीचे सरकार पडणार म्हणणे म्हणजे 'मुंगेरीलाल के हसीन सपने"

"महाविकास आघाडीचे सरकार पडणार म्हणणे म्हणजे 'मुंगेरीलाल के हसीन सपने"

Next
ठळक मुद्देआपले आमदार शाबूत ठेवण्यासाठी भाजपकडून हा केविलवाणा प्रयत्न आमचे सरकार कोसळणार नाहीचभाजपने त्यांचे आमदार सांभाळावेत, नाही तर ते आमच्याकडे येतील

जळगाव - महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार, अशी आवई गेल्या काही दिवसांपासून विरोधीपक्ष असलेल्या भाजपकडून उठवली जात आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. आमचे सरकार स्थापन झाले, तेव्हापासून भाजपकडून सरकार पडणार असा दावा केला जात आहे. पण त्याला काही एक अर्थ नाही. महाविकास आघाडीचे सरकार पडणार म्हणजे हे भाजपचे 'मुंगेरीलाल के हसीन सपने' आहेत. आपले आमदार शाबूत ठेवण्यासाठी भाजपकडून हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. आमचे सरकार कोसळणार नाहीच, उलट भाजपने त्यांचे आमदार सांभाळावेत. नाही तर ते आमच्याकडे येतील, अशा शब्दांत शिवसेनेचे उपनेते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर येथील अजिंठा विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण, भाजपकडून महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची सुरू असलेली चर्चा, राज्य सरकारकडून होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या अशा विविध विषयांवर मते मांडली. भाजपच्या सरकार कोसळणार असल्याच्या टीकेला त्यांनी आपल्या खास शैलीत जोरदार समाचार घेतला. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार पडणार, असा दावा भाजपकडून कितीही सुरू असला तरी त्याला काहीही अर्थ नाही. सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचा हा दावा सुरू आहे. राजस्थानचे सरकार पडणार अशी चर्चा होती. राजस्थानचे सरकार आम्ही पाडू, असा भाजपचा दावा होता. मात्र, आपण पाहिले की राजस्थानच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. राजस्थानचे बहुमत पाहिले तर ते अवघे 10 ते 20 मतांचे होते. आपल्याकडे 170 आमदार एकत्र आहेत. म्हणजेच सरकार पडणार हे भाजपचे 'मुंगेरीलाल के हसीन सपने' आहेत. आपले आमदार शाबूत ठेवण्यासाठी भाजपकडून हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. आमदार फुटू नयेत म्हणून भाजपकडून केविलवाणा प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पडेल, मग आपले सरकार येईल. आपले मंत्री होऊन आपली कामे होतील, अशा प्रकारची लालसा भाजप आपल्या आमदारांना दाखवत आहे. पण आमचे सरकार पाच वर्षे सुरळीतपणे चालणार आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

अधिकाऱ्यांच्या बदल्या ही नियमित प्रक्रिया 
राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या भाजपच्या आरोपांवर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, अधिकाऱ्यांच्या बदल्या ही नियमित प्रक्रिया आहे. त्यात गैर काहीही नाही. मागे पाच वर्षे त्यांचेही सरकार होते. त्यावेळी आम्ही त्यांच्या सोबत होतो. तेव्हाही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. तेव्हा तर एकाच महिन्यात दोन-दोन, तीन-तीन बदल्या झालेल्या मी पाहिल्या आहेत. जर बदल्यांची चौकशी करायची असेल तर मग गेल्या 6 वर्षांत झालेल्या बदल्यांची व्हायला हवी. त्यात किती गैरप्रकार झाले आहेत, ते लक्षात येईल ना? मात्र, चंद्रकांत पाटील हे माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंत्री होते. त्यांनी केलेला हा आरोप म्हणजे सरकारला तसेच मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी केली.

शरद पवार हे सर्वेसर्वा 
पार्थ पवारांच्या विषयावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, पार्थ पवार यांच्या विषयावरून नाहक राजकारण सुरू आहे. शेवटी शरद पवार हे सर्वेसर्वा आहेत. शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात राजकारणाच्या पलीकडे नाते आहेत. आजोबा म्हणून त्यांचा कान पकडण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे या विषयावर होणारी टीका चुकीची आहे. इकडे आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत देखील त्यांना हे पद दिले म्हणून टीका सुरू आहे. आता देवेंद्र फडणवीस यांना भाजपने बिहारची जबाबदारी दिली म्हणून आम्ही काय त्यांना 'ही' जबाबदारी दिली म्हणतोय का? ज्या व्यक्तीमध्ये जी क्षमता असते, त्यानुसार पक्ष जबाबदारी देत असतो. मात्र, आदित्य ठाकरे हे ठाकरे असल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

इतर महत्त्वाच्या बातम्या

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

Web Title: To say that Mahavikas Aghadi government will fall is 'Mungerilal K Haseen Sapne' -Gulabrao Patil attack on BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.