दुसऱ्या टप्प्यात ४५ उमेदवार कोट्यधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 04:58 AM2019-04-18T04:58:31+5:302019-04-18T04:58:52+5:30
राज्यातील दुस-या टप्प्यातील १७८ उमेदवारांपैकी ४५ जण कोट्यधीश आहेत.
राज्यातील दुस-या टप्प्यातील १७८ उमेदवारांपैकी ४५ जण कोट्यधीश आहेत. त्यात वंचित बहुजन आघाडीच्या सर्वाधिक ७, तर भाजप-काँग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी ५, राष्टÑवादीचे ४, बसप व बहुजन मुक्ती पक्षाचे प्रत्येकी ३ उमेदवार कोट्यधीश आहेत. स्वतंत्र भारत पक्ष व पिपल्स पार्टी आॅफ इंडिया (डे.)च्या प्रत्येकी एका व अपक्ष/ इतर असे ११ उमेदवार कोट्यवधी आहेत.या निवडणुकीत विश्लेषण करण्यात आलेल्या
178
उमेदवारांपैकी गुन्हे असलेले उमेदवार ३८ असून त्यांचे प्रमाण २१ टक्के आहे. यामध्ये विविध पक्षांचे १७ उमेदवार असून त्यात शिवसेनेचे ४, काँग्रेसचे ३, राष्ट्रवादीचे ३ उमेदवारांचा समावेश आहे, तर गंभीर गुन्हे असलेले २३ उमेदवार असून त्याचे प्रमाण १३ टक्के इतके आहे. यामध्ये विविध पक्षांच्या ९ उमेदवारांचा समावेश असून यामध्ये शिवसेनेच्या १, काँग्रेसच्या २ आणि राष्ट्रवादीच्या २ उमेदवारांनी गुन्ह्यांचा उल्लेख त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. उमेदवारांची सरासरी मालमत्ता २.८३ कोटी रुपयांची असल्याचे या अहवालाद्वारे उघड झाले आहे.
>उमेदवारांचे शिक्षण
अशिक्षित : 0१
शिक्षित : 0७
पाचवी : १०
आठवी : १९
दहावी : २८
बारावी : ३६
पदवीधर : २८
व्यावसायिक
पदवीधर : १९
पदव्युत्तर : २0
डॉक्टरेट : 0४
इतर : 0६
>गुन्हे नोंद असलेले उमेदवार
वंबआ 0४
बसप 0३
शिवसेना 0४
भाजप 0२
काँग्रेस 0३
राष्ट्रवादी 0३
सप 0३
भाकप 0१
अपक्ष व इतर १३
>उमेदवारांची सरासरी मालमत्ता
पक्ष उमेदवार सरासरी
वंबआ ९ ६.२९
बसप ७ ७.३२
काँग्रेस ५ २२.३९
भाजप ५ १२.२२
शिवसेना ५ ५.४०
राष्टÑवादी ४ १८.०१
मालमत्ता(कोटी)