"भाजपात जाणं ही खूप मोठी चूक"; मुंडण आणि शुद्धीकरण करून 200 कार्यकर्त्यांचा TMC मध्ये प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 02:49 PM2021-06-23T14:49:11+5:302021-06-23T14:55:35+5:30

West Bengal BJP And TMC : हुगळी जिल्ह्यात जवळपास 200 कार्यकर्त्यांनी भाजपामधून बाहेर पडत पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची घटना घडली आहे. 

several bjp workers jump ship and join tmc by tonsuring heads in hooghly west bengal | "भाजपात जाणं ही खूप मोठी चूक"; मुंडण आणि शुद्धीकरण करून 200 कार्यकर्त्यांचा TMC मध्ये प्रवेश 

"भाजपात जाणं ही खूप मोठी चूक"; मुंडण आणि शुद्धीकरण करून 200 कार्यकर्त्यांचा TMC मध्ये प्रवेश 

googlenewsNext

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीआधी तृणमूल काँग्रेसला रामराम करून अनेक नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी ममता बँनर्जींना जोरदार धक्का दिला होता. मात्र त्यानंतर आता यातील काही कार्यकर्ते बॅकपूटवर आलेले पाहायला मिळत आहेत. पश्चिम बंगालमध्येभाजपाचे अनेक कार्यकर्ते गावभर फिरुन जनतेची माफी मागत आहेत. विधानसभा निवडणुकांनंतर बंगालचं राजकारण ढवळून निघालं. तृणमूल काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांनी घरवापसी केली आहे. याच दरम्यान हुगळी जिल्ह्यात जवळपास 200 कार्यकर्त्यांनी भाजपामधून बाहेर पडत पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची घटना घडली आहे. 

कार्यकर्त्यांनी गंगाजलने आपलं शुद्धीकरण करुन घेतलं. भाजपामध्ये प्रवेश करणं आपली खूप मोठी चूक होती असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तसेच त्यांना आपल्या या चुकीसाठी मुंडण करुन घेत आणि गंगाजल शिंपडून शुद्धीकरण केलं आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हुगळी येथील भाजपा कार्यकर्त्यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाचा झेंडा हाती घेतला आणि स्थानिक खासदारांना पाठिंबा दर्शवला आहे. टीएमसीचे खासदार अपरुपा पोद्दार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी त्यांनी आरामबाग येथे गरीबांना मोफत अन्न पुरवण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. 

कार्यक्रमासाठी काही लोक आले आणि आपण भाजपामध्ये जाऊन खूप मोठी चूक केली असल्याचं म्हटलं. आपल्या चुकीचं प्रायश्चित्त केल्यानंतर ते पुन्हा टीएमसीत येऊ इच्छित होते. विधानसभा निवडणुकीत टीएमसीला मिळालेल्या यशानंतर अनेक जिल्ह्यांमधील कार्यकर्ते पुन्हा एकदा टीएमसीमध्ये येत आहेत. याआधी बीरभूम येथे 50 हून अधिक भाजपा कार्यकर्त्यांनी टीएमसीच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करत आपल्याला पुन्हा पक्षात घ्यावं अशी मागणी केली होती. यानंतर त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला होता. यावेळी त्यांनी भाजपात प्रवेश केल्याबद्दल खेद व्यक्त केला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बीरभूम जिल्ह्यातील लाभपूर, बोलपूर, सैथिया तसंच हुगली जिल्ह्यातल्या धनियाकली या गावांमधून भाजपा कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी सार्वजनिक माफीनाम्याचा कार्यक्रम केला होता. भाजपाने गोड बोलून गळ घातली होती पण तो पक्ष फ्रॉड आहे. आमच्याकडे ममता बॅनर्जी यांच्याशिवाय कोणताही पर्याय नाही आणि आम्ही त्यांच्या विकास कार्यक्रमाचा भाग व्हायलाच हवं. मुकूल मंडल नावाच्या एका भाजपा कार्यकर्त्याने सांगितलं की, मी भाजपाला ओळखायला चुकलो. मला तृणमूलमध्ये परत जायचं आहे. सैथियामध्ये तर भाजपाचे 300 कार्यकर्ते शपथ घेतल्यानंतर तृणमूलमध्ये परतले आहेत. 

भाजपा कार्यकर्ते माफी मागत असताना दुसरीकडे भाजपाने सार्वजनिक माफिनाम्यामागे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची चाल आहे. त्यांनी या कार्यकर्त्यांना घाबरवलं आणि धमकावलं असणार आहे असं म्हटलं आहे. भाजपाचे माजी युवा मोर्चा मंडल अध्यक्षांनी आम्ही चुकून भाजपामध्ये गेलो होतो. आम्ही ममता यांच्या कामाच्या समर्थनार्थ आजच तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होत आहोत. मी भाजपासाठी काहीही करू शकत नाही पण मी तृणमूलच्या विकासकामामध्ये सहभागी व्हायला जात आहे असं म्हटलं होतं. 

Web Title: several bjp workers jump ship and join tmc by tonsuring heads in hooghly west bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.