शरद पवार-देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शाहांची भेट? NCP ने ‘त्या’ फोटोचा केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 07:23 PM2021-11-26T19:23:17+5:302021-11-26T19:25:08+5:30

राज्यातील प्रमुख नेते दिल्ली दौऱ्यावर असल्याने राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.

Sharad Pawar-Devendra Fadnavis meet Amit Shah? NCP reveals viral photo | शरद पवार-देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शाहांची भेट? NCP ने ‘त्या’ फोटोचा केला खुलासा

शरद पवार-देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शाहांची भेट? NCP ने ‘त्या’ फोटोचा केला खुलासा

googlenewsNext

मुंबई – महाराष्ट्रातील प्रमुख नेते दिल्ली दौऱ्यावर असल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यात सत्तांतर होईल अशी भविष्यवाणी केली त्यामुळे नेमकं दिल्लीत काय शिजतंय? असाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे. नियोजित दौरा सोडून शरद पवार(Sharad Pawar) दिल्लीला रवाना झाल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. त्यात आता शरद पवार-देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाहांची(Amit Shah) भेट घेतल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

या फोटोबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन खुलासा केला आहे. NCP ने ट्विट करुन म्हटलंय की, अधिवेशनाच्या तोंडावर सरकार पाडण्याच्या 'गजाल्या' सुरू झाल्यात. त्यासाठी 'असले' मॉफ् केलेले बचकांडे हातखंडे. पण आता मॉफ् ला माफी नाही. फसव्या फोटोशॉप जल्पकांचा (ट्रोल्स) शोध घेणं अवघड नाही. महाराष्ट्र सायबर सेलने असले छुपे छद्मउद्योग करणाऱ्यांना शोधून काढावे असं सांगत त्यांनी पोलिसांना या प्रकरणी शोध घेण्याचं विनंती केली.

देवेंद्र फडणवीसांनीही दिलं स्पष्टीकरण

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) खुलासा केला आहे की, मी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बैठकीसाठी आलो आहे. याठिकाणी आमचे संघटनमंत्री आणि इतर सहकारी यांच्यासोबत ४-५ तास बैठक झाली. या बैठकीत पक्षाची पुढील वाटचाल आणि संघटनात्मक आढावा घेण्यात आला. त्यामुळे बाकी कुठलाही अजेंडा आमचा नाही. कुठली राजकीय चर्चा बाहेर सुरू आहे याची कल्पना नसल्याचं ते म्हणाले.

राज्यातील प्रमुख नेते दिल्लीला

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार(Sharad Pawar) शुक्रवारी सर्व कार्यक्रम रद्द करत दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. नियोजित सर्वच कार्यक्रम सोडून पवार दिल्लीला गेल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीतच आहेत. त्यामुळे, पवारांच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीदेखील पुढील काही महिन्यात महाराष्ट्रात मोठा बदल दिसून येईल, असा मोठा दावा केल्यानं नेमकं राज्याच्या राजकीय वर्तुळात काय सुरु आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Web Title: Sharad Pawar-Devendra Fadnavis meet Amit Shah? NCP reveals viral photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.