घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पाहिला नाही; शरद पवारांचा कोश्यारींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 12:32 PM2021-03-14T12:32:57+5:302021-03-14T12:37:42+5:30
Shrarad pawar reaction on governor bhagat singh koshyari: सध्या शेतकरी वर्गाची स्थिती नाजुक आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, कधी नव्हे ते राज्य मोठ्या आर्थिक संकटात आहे. मात्र राज्य सरकार या सर्व अडचणींमधून नक्कीच मार्ग काढेल.
बारामती : घटनेनुसार राज्यसरकारने केलेल्या शिफारशींना मान्यता देणे ही राज्यपालांची जबाबदारी असते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लोकशाहीची आणि घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला, ही दुर्दैवी गोष्ट आहे, असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार (Shrarad pawar ) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे. (never saw governor like bhagat singh koshyari : Sharad Pawar.)
बारामती येथे माध्यमांशी बोलताना, विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्त्या अनेक दिवस उलटल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रखडवल्या आहेत. यावर भाष्य करताना पवार म्हणाले, मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांना देखील तत्कालीन राज्यपालांनी अशाप्रकारचा त्रास दिल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये देखील राज्यपाल याच पद्धतीने राज्यशासनाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी मात्र केंद्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. ही गोष्ट चिंताजनक आहे, अशा शब्दांत पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शेतकरी आंदोलनाला शंभर दिवस उलटून सुद्धा शेतकऱ्यांना खलिस्थानी, दहशतवादी संबोधत असतील तर यावर काय भाष्य करणार. शेतकऱ्यांच्या भूमिकेसंदर्भात केंद्र सरकारने सामंजस्याची भूमिका न घेतल्यामुळे संसदेचे कामकाज बंद पडले. या प्रश्नावर शेतकरी जसे अस्वस्थ आहेत. तसेच संसद देखील अस्वस्थ आहे. त्यामुळे याबाबतची प्रतिक्रिया उद्याच्या कामकाजात नक्की उमटेल, अशी आशा वाटत असल्याचे पवार म्हणाले.
सध्या शेतकरी वर्गाची स्थिती नाजुक आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, कधी नव्हे ते राज्य मोठ्या आर्थिक संकटात आहे. मात्र राज्य सरकार या सर्व अडचणींमधून नक्कीच मार्ग काढेल.