शत्रुघ्न सिन्हा पत्नीच्या प्रचारात; काँग्रेसमध्ये नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 05:01 IST2019-04-19T05:00:11+5:302019-04-19T05:01:08+5:30
शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप सोडून कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र आपल्या पत्नी व समाजवादी पक्षाच्या लखनऊमधील उमेदवार पूनम सिन्हा यांच्या प्रचार यात्रेत ते गुरुवारी सामील झाले.

शत्रुघ्न सिन्हा पत्नीच्या प्रचारात; काँग्रेसमध्ये नाराजी
लखनऊ : ‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप सोडून कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र आपल्या पत्नी व समाजवादी पक्षाच्या लखनऊमधील उमेदवार पूनम सिन्हा यांच्या प्रचार यात्रेत ते गुरुवारी सामील झाले. त्यामुळे कॉँग्रेसचे उमेदवार आचार्य प्रमोद कृष्णम यांनी नाराजी व्यक्त केली. शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षधर्म सांभाळला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली.
लखनऊने गेली २८ वर्षे भाजपच्या उमेदवारालाच साथ दिली आहे. यंदा गृहमंत्री राजनाथ सिंह यांना लढतीत आणले आहे. पाटण्याच्या रहिवासी पूनम सिन्हा आणि संभल येथील आचार्य प्रमोद कृष्णम यांच्यामुळे निवडणुकीत रंगत आली आहे.
लखनऊमध्ये कायस्थ मतदारांची संख्या तीन ते साडेतीन लाख आहे. शिवाय सव्वालाख सिंधी मतदार आहेत. पूनम सिन्हा जन्माने सिंधी असून, शत्रुघ्न मात्र कायस्थ आहेत.