कोंबडी चोर!; नारायण राणेंविरोधात मुंबईत शिवसेनेची बॅनरबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 10:26 AM2021-08-24T10:26:28+5:302021-08-24T10:27:01+5:30

​​​​​​​Narayan Rane vs Shivsena: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्याचं राजकारण तापलं आहे.

Shiv Sena banner against bjp leader Narayan Rane in Mumbai cm uddhav thackeray comment | कोंबडी चोर!; नारायण राणेंविरोधात मुंबईत शिवसेनेची बॅनरबाजी

कोंबडी चोर!; नारायण राणेंविरोधात मुंबईत शिवसेनेची बॅनरबाजी

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्याचं राजकारण तापलं आहे.

Narayan Rane vs Shivsena: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्याचं राजकारण तापलं आहे. नारायण राणे यांच्याविरोधात राज्यात विविध ठिकाणी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात मुंबईतील दादर टीटी परिसरात बॅनरबाजी पाहायला मिळाली. शिवेसेनेनं नारायण राणे यांचा कोंबडी चोर असा उल्लेख करत डिवचणारा बॅनर लावला होता. परंतु पोलिसांनी सध्या हे बॅनर काढून टाकलं आहे. शिवसेनेकडून लावण्यात आलेलं हे बॅनर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

राज्यात ठिकठिकाणी शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले असून राणेंविरोधात निदर्शनं करण्यात आली. मुंबईतील जुहू येथे नारायण राणेंच्या निवासस्थानाबाहेर देखील तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. याशिवाय अनेक शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेर जमून राणेंविरोधात घोषणाबाजी केली. 

काय होतं राणेंचं वादग्रस्त विधान?
नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेवेळी काल महाड येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राणे यांनी जोरदार प्रहार केला. मात्र, टीका करण्याच्या नादात राणे यांनी वादग्रस्त विधान केले. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती, असे नारायण राणे म्हणाले. या पत्रकार परिषदेला भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं चिथावणीखोर विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना महागात पडण्याची शक्यता आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. 

Web Title: Shiv Sena banner against bjp leader Narayan Rane in Mumbai cm uddhav thackeray comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.