भाजपाचा महापौर अन् शिवसेना नगरसेवकाकडून सत्कार; पालकमंत्र्यांनी सुनावताच दिला राजीनामा

By प्रविण मरगळे | Published: March 1, 2021 05:03 PM2021-03-01T17:03:00+5:302021-03-01T17:04:57+5:30

Shivsena Internal Disputes in Jalgoan: या प्रकरणावरून पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी नाराजी व्यक्त केली होती

Shiv sena corporator resigns after BJP mayor felicitation in Jalgaon Municipal Corporation | भाजपाचा महापौर अन् शिवसेना नगरसेवकाकडून सत्कार; पालकमंत्र्यांनी सुनावताच दिला राजीनामा

भाजपाचा महापौर अन् शिवसेना नगरसेवकाकडून सत्कार; पालकमंत्र्यांनी सुनावताच दिला राजीनामा

Next
ठळक मुद्देगटनेते अनंत जोशी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा महानगरप्रमुख शरद तायडे यांच्याकडे सोपवला आहेमहासभेत महापौर भारती सोनवणे यांनी वर्षभरात केलेल्या कामांबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता.शिवसेना नगरसेवकांनी भाजपा महापौर भारती सोनवणे यांचा सत्कार केल्याने नाराजीनाट्य सुरू झालं

जळगाव – एकीकडे राज्यात शिवसेना-भाजपा यांच्यातील विस्तव जात नसताना दुसरीकडे शिवसेनेच्या गटनेत्याने भाजपा महापौराचा सत्कार केल्याचं चर्चा सध्या शहरात रंगली आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी जळगाव महापालिकेच्या महासभेत भाजपा महापौर भारती सोनवणे यांचा जाहीर सत्कार केला. मात्र या सत्कारावरून शिवसेनेतील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे.(Internal Disputes in Shivsena Jalgaon, Shiv Sena corporator resigns after BJP mayor felicitation)

या प्रकरणावरून पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर गटनेते अनंत जोशी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा महानगरप्रमुख शरद तायडे यांच्याकडे सोपवला आहे. मात्र या प्रकरणावरून शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. महासभेत महापौर भारती सोनवणे यांनी वर्षभरात केलेल्या कामांबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता.

राज्यातील इतर महापालिकांप्रमाणे जळगावात भाजपाविरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असं समीकरण जुळत असताना विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना नगरसेवकांनी भाजपा महापौर भारती सोनवणे यांचा सत्कार केल्याने नाराजीनाट्य सुरू झालं, गटनेत्यांनी केलेल्या या प्रकारामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली, ही गोष्ट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना समजताच त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली, एकीकडे विरोध असताना दुसरीकडे अशाप्रकारचे कार्यक्रम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना न विचारताच करणे चुकीचं आहे असं पालकमंत्री म्हणाले.

संपर्कप्रमुक संजय सावंत यांनीही शहराच्या दौऱ्यावर असताना कोणतेही आंदोलन, कार्यक्रम, मोर्चे याबाबत जिल्हाध्यक्ष, महानगरप्रमुखांना पूर्वसूचना देऊनच करावे अशी सूचना दिली होती, परंतु शुक्रवारी झालेल्या महासभेत शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी आणि नगरसेवक प्रशांत नाईक यांनी महापौरांचा अचानक केलेल्या सत्काराबद्दल संपर्कप्रमुखांनीही नाराजी व्यक्त केली होती, याबाबत संबंधित नगरसेवकांना समज दिल्याचंही संजय सावंत यांनी सांगितले होते, मात्र त्यानंतर हा राजीनामा देण्यात आला आहे.

जळगाव महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजपा एकमेकांमध्येच लढत झाली. त्यातच विधानसभेच्या निवडणुकीत एकत्र लढवून देखील झालेल्या राजकीय घडामोडी व त्यानंतर राज्यात नव्याने निर्माण झालेले समीकरणे यावरून सध्यस्थितीत शिवसेना व भाजपमध्ये राजकीय युध्द रंगले आहे. अशातच या कार्यक्रमामुळे शिवसेनेतील अंतर्गत नाराजी समोर आली आहे.     

Web Title: Shiv sena corporator resigns after BJP mayor felicitation in Jalgaon Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.