... की शिवसेनेनं देशाबाहेर लग्न लावून देण्याचं काम हाती घेतलंय?; भाजप नेत्याचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 02:23 PM2020-12-29T14:23:20+5:302020-12-29T14:34:23+5:30
nitesh rane criticize shiv sena : आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल असे बॅनर्स शिवसेनेनं झळकावले असल्याचा भाजप नेत्याचा दावा.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) रविवारी समन्स बजावलं. त्यानंतर याबाबत संजय राऊत पत्रकार परिषद घेत असताना दुसरीकडे मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ईडीच्या कार्यालयाबाहेर काही शिवसैनिकांनी भाजप प्रदेश कार्यालयाचा बॅनर झळकवला होता. तर काही ठिकाणी शिवसैनिकांनी आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल असे बॅनर्स झळकावले असल्याचा दावा करत भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
"शिवसैनिकांनी काही ठिकाणी पोस्टर लावले. आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल. देशाबाहेर नोकरी द्यायचा धंदा सुरू केला की काय शिवसेनेने? की देशाबाहेर लग्न लावून द्यायचं काम हाती घेतलं?? या दोन व्यवसायांच्या मार्केटिंगसाठी हे वाक्य सॉलिड आहे," असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर हल्लाबोल केला.
संज्या सारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही. ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढलं तो मैदानात लढण्याची वार्ता करतो, मैदानात आल्यावर कळेल संज्याला 'नागडं' कशाला म्हणतात. मग म्हणतच बसावं लागेल ' मै नंगा हू'. एका नोटीसला इतका घाबरला संज्या.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 29, 2020
"संजय राऊतांसारखे मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही. ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढलं तो मैदानात लढण्याची वार्ता करतात, मैदानात आल्यावर कळेल त्यांना 'नागडं' कशाला म्हणतात. मग म्हणतच बसावं लागेल ' मै नंगा हू'. एका नोटीसला इतके घाबरले संजय राऊत," असंही ते म्हणाले.
शिवसैनिकांनी काही ठिकाणी पोस्टर लावले “आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल”. देशा बाहेर नोकरी द्यायचा धंदा चालू केला की काय शिवसेनेने?? की देशाबाहेर लग्न लावून द्यायचं काम हाती घेतलं?? ह्या दोन व्यवसायांच्या मार्केटिंगसाठी हे वाक्य सॉलिड आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 29, 2020
ईडीच्या नोटीसीवर काय म्हणाले होते राऊत?
"केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना जेव्हा विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही, तेव्हा ईडी, सीबीआयसारखी हत्यारं वापरावी लागतात. त्यामुळेच वर्षभरात शरद पवार, प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईकांना ईडीकडून नोटीसा पाठवण्यात आल्या. भाजपला रोखण्याच्या प्रक्रियेत असलेले नेते जेव्हा दबावाला बळी पडत नाहीत, तेव्हा त्यांना असे कागदाचे तुकडे पाठवले जातात. पूर्वी सीबीआय, ईडीनं कारवाई केली की लोकांना त्याबद्दल गांभीर्य वाटायचं. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या कारवाया म्हणजे केंद्रातल्या पक्षानं भडास काढणं हे लोकांनी गृहित धरलं आहे," अशा शब्दांत राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता.