शिवसेनेत घुसमट? वेगळा मार्ग शोधणार?; नारायण राणेंच्या विधानावर एकनाथ शिंदे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 01:07 PM2021-08-22T13:07:36+5:302021-08-22T13:09:45+5:30

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विधानावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

shiv sena leader eknath shindes reaction on bjp leader narayan ranes statement | शिवसेनेत घुसमट? वेगळा मार्ग शोधणार?; नारायण राणेंच्या विधानावर एकनाथ शिंदे म्हणतात...

शिवसेनेत घुसमट? वेगळा मार्ग शोधणार?; नारायण राणेंच्या विधानावर एकनाथ शिंदे म्हणतात...

Next

मुंबई: राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेमध्ये घुसमट सुरू आहे. ते केवळ सहीपुरतेच उरले आहेत. नगरविकास खात्याचा कारभार मातोश्रीवरूनच चालतो. यामुळे शिंदे हे वेगळा मार्ग शोधण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी भाजपमध्ये यावे, असं आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल केलं. राणेंच्या या दाव्याला आता खुद्द एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मला कामाचं स्वातंत्र्य नाही. माझ्या विभागाचा कारभार मातोश्रीवरून चालतो, हा शोध नारायण राणेंनी कुठून लावला ते माहीत नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 'मला माझ्या विभागात काम करताना पूर्ण स्वातंत्र्य आहे. अनेक प्रलंबित प्रश्न मी मंत्री म्हणून मार्गी लावले आहेत. बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्गाचं काम आम्ही पुढे नेत आहोत,' असंही शिंदे पुढे म्हणाले. मी पक्षात समाधानी आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या दाव्यात, त्यांच्या विधानात कोणतंही तथ्य नाही. त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे. मातोश्रीकडून माझ्या कामात कोणताही हस्तक्षेप होत नाही. मला स्वातंत्र्य नसतं, तर मी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकलोच नसतो, असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं. 

नारायण राणेंचा शिवसेना, ठाकरे सरकारवर हल्लाबोल
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू असून शनिवारी त्यांनी वसई- विरार शहराचा दौरा केला. गोमूत्र शिंपडण्याचे उद्योग करण्यापेक्षा रोजगार देण्याचे व्यवसाय करा, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर घणाघाती हल्ला केला. भरपावसात काढलेल्या या यात्रेला मोठी गर्दी जमली होती. यात्रेदरम्यान त्यांनी वसईतील उद्योजकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. जेवढी कामे मी केली आहेत, त्यापेक्षा एक दशांश कामेही उद्धव ठाकरे यांनी केलेली नसल्याचं ते म्हणाले.

Web Title: shiv sena leader eknath shindes reaction on bjp leader narayan ranes statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.