शिवसेना नेते रामदास कदम मोठा निर्णय घेण्याच्या विचारात?; थोड्याच वेळात घेणार पत्रकार परिषद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 10:00 AM2021-12-18T10:00:29+5:302021-12-18T10:08:47+5:30

कथित ऑडिओ क्लीप प्रकरणावरुन रामदास कदम यांच्यावर शिवसेनेचं नेतृत्व नाराज असल्याचं दिसून आलं.

Shiv Sena leader Ramdas Kadam ready to take big decision ?; A press conference will be held shortly | शिवसेना नेते रामदास कदम मोठा निर्णय घेण्याच्या विचारात?; थोड्याच वेळात घेणार पत्रकार परिषद

शिवसेना नेते रामदास कदम मोठा निर्णय घेण्याच्या विचारात?; थोड्याच वेळात घेणार पत्रकार परिषद

googlenewsNext

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेत नाराज असलेले रामदास कदम हे अखेर आपल्या मनातील खदखद बाहेर काढण्याची शक्यता आहे. दुपारी १२ च्या सुमारात कदम पत्रकार परिषद घेणार आहे. अलीकडेच मंत्री अनिल परब रत्नागिरी दौऱ्यावर असताना रामदास कदम समर्थकांची शिवसेनेच्या पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे रामदास कदम(Ramdas Kadam) संतप्त असल्याचं सांगण्यात येत आहे.

कथित ऑडिओ क्लीप प्रकरणावरुन रामदास कदम यांच्यावर शिवसेनेचं नेतृत्व नाराज असल्याचं दिसून आलं. भाजपा नेते किरीट सोमय्या(BJP Kirit Somaiya) यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता. त्याला खतपाणी देण्याचं काम रामदास कदम यांनी केले असल्याचा आरोप झाला. इतकचं नाही तर रामदास कदमांची एक ऑडिओ क्लीप बाहेर आली होती. यात अनिल परबांवर जी कारवाई झाली त्यावर आनंद व्यक्त करताना दिसत होते. मात्र या ऑडिओ क्लीपमधील आवाज आपला नसल्याचा दावा रामदास कदमांनी केला.

दरम्यान, अलीकडेच दापोली नगर पंचायत निवडणुकीच्यानिमित्ताने पक्षाची शिस्त पाळली नाही, असे कारण देत शिवसेनेच्या तीन विद्यमान पदाधिकाऱ्यांना नारळ देण्यात आला असून, चार नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नारळ देण्यात आलेले तीनही पदाधिकारी शिवसेना नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांच्याशी जवळीक असलेले आहेत आणि नियुक्त झालेले चारही नवीन पदाधिकारी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याशी जवळीक असलेले आहेत. या नव्या घडामोडींमुळे पालकमंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी रामदास कदम, योगेश कदम यांच्या गटाला मोठा धक्का दिला आहे, असे मानले जात होते.

शिवसेना नेतृत्व नाराज

शिवसेना दसरा मेळाव्यातही रामदास कदम गैरहजर होते. इतकचे नाही तर विधान परिषद निवडणुकीत रामदास कदम यांचा पत्ता कट करत त्यांच्या ऐवजी सुनील शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. रामदास कदम यांच्या समर्थकांकडून पद काढून शिवसेनेने कदमांना मोठा झटका दिला. त्यामुळे पक्ष अनिल परब यांच्या पाठिशी असल्याचं ठामपणे दाखवून देत असल्यानं रामदास कदम संतप्त झाले आहेत.

Web Title: Shiv Sena leader Ramdas Kadam ready to take big decision ?; A press conference will be held shortly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.