पावसाळ्याआधी झाली नाही नालेसफाई, ठेकेदाराला कचऱ्याने स्नान घालत आमदाराची शिवसेनास्टाईल कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 12:58 PM2021-06-13T12:58:15+5:302021-06-13T12:58:32+5:30

Shiv Sena MLA  Dilip Lande: मुंबईतील कुर्ला परिसरात पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण न झाल्याने संतप्त झालेल्या शिवसेना आमदाराने ठेकेदाराविरोधात शिवसेनास्टाईल कारवाई केली आहे.

Shiv Sena MLA Dilip Lande makes a contractor sit on water logged road & dump garbage on him | पावसाळ्याआधी झाली नाही नालेसफाई, ठेकेदाराला कचऱ्याने स्नान घालत आमदाराची शिवसेनास्टाईल कारवाई 

पावसाळ्याआधी झाली नाही नालेसफाई, ठेकेदाराला कचऱ्याने स्नान घालत आमदाराची शिवसेनास्टाईल कारवाई 

Next

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील दैनंदिन जीवनाचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साठून वाहतूक खोळंबण्याचे प्रकार घडत आहेत. (Shiv Sena MLA  Dilip Lande ) तर काही ठिकाणी साठलेले पाणी थेट घरांमध्ये घुसत आहे. दरम्यान, मुंबईतील कुर्ला परिसरात पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण न झाल्याने संतप्त झालेल्या शिवसेनाआमदाराने ठेकेदाराविरोधात रोखठोक कारवाई केली आहे. (Shiv Sena MLA from Chandivali, Dilip Lande makes a contractor sit on water logged road & asks workers to dump garbage on him)

पावसाळ्याआधी नालेसफाई पूर्ण न झाल्याने संतप्त झालेल्या शिवसेनाआमदार दिलीप लांडे यांनी थेट ठेकेदारालाच नाल्याजवळ उभे केले. त्यानंतर त्याला कचऱ्याने स्नान घातले. यावेळी दिलीप लांडे म्हणाले की, ज्या लोकांना यावेळी इथे उपस्थित राहणे आवश्यक होते ते गायब आहेत. लोकांनी विश्वास ठेवून मला आमदार बनवले आहे. मी त्यांचा विश्वास तुटू देणार नाही. माझ्या भागात पाणी तुंबले तर मी स्वत: गटारात उतरून गटार स्वच्छ करेन. लोकांना कुठल्याही त्रासाचा सामना करावा लागू नये म्हणून आमचे शिवसैनिक सातत्याने काम करत आहेत. 

शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी मान्सूनच्या आधी एका ठेकेदाराला नालेसफाईचा ठेका दिला होता. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन या ठेकेदाराने दिले होते. मात्र ठरल्या वेळेत या ठेकेदाराने नालेसफाईचे काम पूर्ण केले नाही. त्यामुळे आता पावसाळ्याला सुरुवात झाल्यावर रस्त्यावर पाणी तुंबत आहे. त्यामुळे दिलीप लांडे संतप्त झाले. त्यांनी नालेसफाई करणाऱ्या ठेकेदाराला बोलावून घेतले. 

ठेकेदार आल्यावर आमदार दिलीप लांडे त्याला ज्या ठिकाणी पाणी भरले होते, अशा सर्व ठिकाणी घेऊन गेले. यावेळी रस्त्यावर पाणी तुंबलेले पाहून दिलीप लांडे खूप नाराज झाले. त्यांनी या ठेकेदारास रस्त्याच्या कडेला बसायला सांगितले. त्यानंतर तिथे असलेल्या शिवसैनिकांनी या ठेकेदाराला कचऱ्याने स्नान घातल शिवसेना स्टाईल कारवाई केली. आता या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यानंतर दिलीप लांडे यांनी सांगितले की, ज्यांची नालेसफाई करण्याची जबाबदारी होती त्यांनी आपले काम योग्य पद्धतीने केले नाही. त्यामुळे मला स्वत:ला रस्त्यावर उतरावे लागत आहे. ज्या ठेकेदाराला नालेसफाईचा ठेका देण्यात आला होता. त्याने काम वेळेत पूर्ण केले नाही. नाला स्वच्छ न झाल्याने माझ्या भागातील लोकांना पाणी आणि कचऱ्यातून ये जा करावी लागत आहे. लोकांना होत असेलला त्रास पाहून आम्ही या ठेकेदाराला कचऱ्यात बसवले आहे.  

Web Title: Shiv Sena MLA Dilip Lande makes a contractor sit on water logged road & dump garbage on him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.