VIDEO: "पोलिसांना जरा बाजूला करा, राणेंचा कोथळा बाहेर काढेन; अन्यथा नाव सांगणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 09:45 AM2021-08-25T09:45:16+5:302021-08-25T10:00:12+5:30

शिवसेना आमदार संतोष बांगर यांची नारायण राणेंवर आक्षेपार्ह शब्दांत टीका

shiv sena mla santosh bangar makes controversial statement about bjp leader narayan rane | VIDEO: "पोलिसांना जरा बाजूला करा, राणेंचा कोथळा बाहेर काढेन; अन्यथा नाव सांगणार नाही"

VIDEO: "पोलिसांना जरा बाजूला करा, राणेंचा कोथळा बाहेर काढेन; अन्यथा नाव सांगणार नाही"

Next

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं केंद्रीय मंत्री नारायण राणेंना काल अटक झाली. रात्री त्यांना जामीनदेखील मिळाला. नारायण राणेंच्या अटकेची शक्यता निर्माण झाल्यापासूनच राज्यातलं राजकारण तापलं. राणेंना जामीन मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यानंतर आता शिवसेना विरुद्ध राणे यांच्यातला संघर्ष वाढला आहे. हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांना राणेंबद्दल प्रक्षोभक विधान केलं आहे.

काल राज्यभरात शिवसैनिक राणेंविरोधात रस्त्यावर उतरले. हिंगोलीत नारायण राणेंचा फोटो कुत्र्याच्या गळ्यात लटकवून प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी तीव्र शब्दांत राणेंचा निषेध केला. राणेंवर टीका करताना आमदार संतोष बांगर यांची जीभ घसरली. त्यांनी राणेंचा एकेरी उल्लेख करत जोरदार टीका केली. नारायण राणेंचा कोथळा काढण्याची भाषा यावेळी बांगर यांनी केली. 

'अरे तू काय सांगतो, कुठं यायचं कुठं यायचं. तुझ्या घरात घुसून तुला मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. माझा पोलीस बंदोबस्त थोडा बाजूला करा. हा संतोष बांगर, शिवसेनेचा मावळा, छत्रपतींचा मावळा एकटा येऊन चारीमुंड्या चीत करेल. तुझा कोथळा बाहेर नाही काढला तर नाव सांगणार नाही,' अशी अतिशय प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह टीका बांगर यांनी केली. 

संतोष बांगर यांनी नारायण राणेंची तुलना कुत्र्याशी करत भाजपलादेखील इशारा दिला. 'नारायण राणेला कोकणातल्या लोकांनी नाकारलं. मुंबईत त्याला मतदारांनी नाकारलं. मात्र भाजपनं केवळ इतरांवर भुंकण्यासाठी त्यांना जवळ केलंय. इतरांच्या अंगावर सोडण्यासाठी भाजपनं त्यांना सोबत घेतलंय. पण जो कधीच कुणाचा झाला नाही, तो भाजपचा तरी काय होणार', अशा शब्दांत बांगर यांनी राणेंवर हल्लाबोल केला.

Web Title: shiv sena mla santosh bangar makes controversial statement about bjp leader narayan rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.