"मी शिवसैनिक आहे, महिलांना धमक्या देत नाही", अरविंद सावंतांनी फेटाळला नवनीत राणांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 11:16 AM2021-03-23T11:16:05+5:302021-03-23T11:34:00+5:30

shiv sena mp arvind sawant : 'मी आजवर कधी कोणाला धमकी दिलेली नाही. महिलेला धमकावण्याचा तर प्रश्नच येत नाही. मी शिवसैनिक आहे. माझ्याकडून असे कधीच होणार नाही, असे अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

shiv sena mp arvind sawant rejects to all allegations of amravati mp navneet rana | "मी शिवसैनिक आहे, महिलांना धमक्या देत नाही", अरविंद सावंतांनी फेटाळला नवनीत राणांचा आरोप

"मी शिवसैनिक आहे, महिलांना धमक्या देत नाही", अरविंद सावंतांनी फेटाळला नवनीत राणांचा आरोप

Next
ठळक मुद्देसचिन वाझे प्रकरणी संसदेत आवाज उठविल्यामुळं अरविंद सावंत यांनी मला धमकी दिल्याची तक्रार राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्राद्वारे केली आहे.

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. मात्र, नवनीत राणा यांनी केलेले धमकीचे आरोप अरविंद सावंत यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहेत. 'मी आजवर कधी कोणाला धमकी दिलेली नाही. महिलेला धमकावण्याचा तर प्रश्नच येत नाही. मी शिवसैनिक आहे. माझ्याकडून असे कधीच होणार नाही, असे अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. (shiv sena mp arvind sawant rejects to all allegations of amravati mp navneet rana)

सचिन वाझे प्रकरणी संसदेत आवाज उठविल्यामुळं अरविंद सावंत यांनी मला धमकी दिल्याची तक्रार राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्राद्वारे केली आहे. 'तू महाराष्ट्रात कशी फिरते, ते मी पाहतो', अशा शब्दांत अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी पत्रात केला आहे. त्यावरून शिवसेनेवर टीका होत आहे. मात्र, अरविंद सावंत यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

"नवनीत राणा जेव्हा कधी मला संसदेत भेटतात. तेव्हा दादा, भैय्या म्हणून हाक मारतात. मी देखील अनेकदा त्यांच्याशी बोलत असतो. काही गोष्टींच्या बाबतीत त्यांना समजावत असतो. पण धमकी वगैरे देण्याचा प्रश्नच येत नाही. उलट त्याच लोकांना धमक्या देत असतात. त्यांना राईचा पर्वत करण्याची सवयच आहे. मागच्या एक वर्षातली त्यांची लोकसभेतली भाषणे बघा. विशेषत: महाराष्ट्र सरकार व शिवसेनेविरोधात त्यांची बोलण्याची पद्धत, शब्द बघा. तुमच्या लक्षात येईल", असे अरविंद सावंत म्हणाले. 

याचबरोबर, " नवनीत राणा यांच्याविरोधात शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे त्यांचा शिवसेनेवर राग आहे. त्या सतत शिवसेनेवर टीका करतात. लोकसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांचे नाव घेऊन व्यक्तिगत टिप्पणी करत असतात. मी त्यांना त्याबद्दलही अनेकदा समजावलो आहे. मात्र, त्यांना धमकी कधीच दिली नाही. माझी ती भाषाही नाही. संसदेच्या लॉबीत मी त्यांना धमकी दिली असे त्यांचे म्हणणे असेल तर किमान आजूबाजूच्या लोकांना तरी माहीत असेल,' असेही अरविंद सावंत यांनी सांगितले.याशिवाय, चेहऱ्यावर अॅसिड फेकून तुझा चेहरा विद्रूप करेन असे कोणी त्यांना बोलले असेल मी स्वत: या गोष्टीचा निषेध करतो. ही अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे. अशी धमकी कोणी त्यांना दिली असेल तर मी नवनीत राणा यांच्या बाजूने उभा राहीन,' असेही अरविंद सावंत यावेळी म्हणाले.

('नवनीतजी, आधी खासदारकीचा राजीनामा द्या, मग नैतिकतेचा पुळका दाखवा')

दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी 100 कोटींच्या मागणीवरुन मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा मुद्दा सोमवारी संसदेत गाजला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक दावा सिंग यांनी पत्रात केला होता. त्यावरून भाजपा खासदारांनी ठाकरे सरकारवर शरसंधान साधले. तसेच अपक्ष खासदार नवनीत राणा यांनीही सरकारला लक्ष्य केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरूनच खंडणी वसुली होत असल्याचा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला.

Web Title: shiv sena mp arvind sawant rejects to all allegations of amravati mp navneet rana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.