राऊत इज बॅक! ...तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही; राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 09:46 PM2021-03-23T21:46:11+5:302021-03-23T21:49:49+5:30

shiv sena mp sanjay raut hits back at bjp leader devendra fadnavis: संजय राऊतांचा पुन्हा आक्रमक अंदाजात; दोन दिवसांत सूर बदलला

shiv sena mp sanjay raut hits back at bjp leader devendra fadnavis | राऊत इज बॅक! ...तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही; राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

राऊत इज बॅक! ...तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही; राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

googlenewsNext

नवी दिल्ली: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. गृहमंत्री देशमुखांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं. या पत्राचे पडसाद थेट संसदेपर्यंत उमटले. त्यातच आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन पोलीस बदल्यांच्या रॅकेटचे पुरावे दिले. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.

अहो आश्चर्यम्... देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांचा 'ठाकरे सरकार'ला एकसारखाच सल्ला

तुम्ही कागदपत्रं घेऊन फिरत राहा. मात्र जोपर्यंत आमच्याकडे बहुमत आहे, तोपर्यंत तुम्ही आमच्या केसालादेखील धक्का लावू शकत नाही, अशा शब्दांत राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. फडणवीस यांनी दिल्लीत गृह सचिवांची भेट घेतल्याबद्दल राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांना यातून आनंद मिळत असल्यास त्यांना आनंद घेऊ द्या. काही जण कागदपत्रं घेऊन येतात. काही जण फाईल आणतात. ठाकरे सरकारला काम करू द्या. हे सर्व करून सरकार कोसळणार नाही, असं राऊत पुढे म्हणाले.

"महाविकास आघाडी ही शिवसेनेची राजकीय मजबुरी", संजय राऊतांनी दिली कबुली 

ते जे कागद फडफडवताहेत त्या कागदपत्रांमध्ये काहीच नाही. गृह सचिवांना त्याचा अभ्यास करायचा असल्यास करू द्या. आम्हाला कोणतीही अडचण नाही, असा टोला त्यांनी लगावला. 'लोकशाहीत अनेकांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री व्हावंसं वाटतं. कोणाला पंतप्रधान व्हावंसं वाटतं. कोणाला गृहमंत्री व्हायचं असतं तर कोणाला राष्ट्रपती,' असा चिमटा राऊत यांनी काढला. विशेष म्हणजे राऊत यांनी गेल्या दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेतला नव्हता. रविवारी तर त्यांनी थेट सरकारमधल्या सर्व घटक पक्षांना आत्मचिंतनाचा सल्ला दिला होता.

आज महाराष्ट्रात आमचं सरकार आहे. आमच्याकडे बहुमत आहे. बहुमत असलेल्या सरकारला दिल्लीत येऊन पाडलं जाऊ शकत नाही. तुम्ही गृहमंत्र्यांकडे जा किंवा पंतप्रधानांकडे जा. जोपर्यंत तुमच्याकडे बहुमत नाही, तोपर्यंत तुम्ही आमच्या सरकारच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. तुम्ही सध्या ज्या गोष्टी करत आहात, त्या घटनाविरोधी आहेत, अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
राऊत इज बॅक! ...तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही; राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Web Title: shiv sena mp sanjay raut hits back at bjp leader devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.