OBC Reservation: “देवेंद्र फडणवीस धनगर आरक्षणाबाबतही असंच बोलले होते”; राऊतांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 03:50 PM2021-06-27T15:50:58+5:302021-06-27T15:52:52+5:30

OBC Reservation: संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

shiv sena sanjay raut replied bjp devendra fadnavis over obc reservation | OBC Reservation: “देवेंद्र फडणवीस धनगर आरक्षणाबाबतही असंच बोलले होते”; राऊतांचा पलटवार

OBC Reservation: “देवेंद्र फडणवीस धनगर आरक्षणाबाबतही असंच बोलले होते”; राऊतांचा पलटवार

Next
ठळक मुद्देसंजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवारपत्रकारांशी संवाद साधताना लगावला टोलाविरोधीपक्षाने जबाबदारीने वागले पाहिजे - राऊत

मुंबई: गेल्या काही दिवासांपासून मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण या दोन मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण ढवळून निघताना पाहायला मिळत आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या विषयावरून भाजपने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केले. यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करू नये, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. (shiv sena sanjay raut replied bjp devendra fadnavis over obc reservation)

संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. तसेच यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असेच वक्तव्य केले होते. कोरोनाचे संकट असतानाही ओबीसी आरक्षणासाठी भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन केले, असे सांगत संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. 

...त्यानंतरच लोकल प्रवासासाठी मुभा; ठाकरे सरकारचा नवा नियम?

विरोधी पक्षाने जबाबदारीने वागले पाहिजे 

विरोधीपक्षाने जबाबदारीने वागले पाहिजे, ही जनतेची अपेक्षा आहे. पण ती जबाबदारी पाळत नसाल, तर आपण जनतेला ज्ञान देण्यात अपुरे पडत आहोत. आपल्यात कमतरता आहेत, असा याचा अर्थ होतो. या कारवाया चुकीच्या पद्धतीने होत आहेत. सत्ता गेल्यावर त्यांना निराशा आली आहे आहे. याच नैराश्यातून आणि वैफल्यग्रस्ततेतून अशा प्रकारच्या चौकश्या सुरू करण्यात आल्या आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. 

संघर्ष नको मग संवादातून मार्ग का काढत नाही?; भाजपचा ठाकरे सरकारला सवाल

हे भारताच्या संघराज्य पद्धतीला हानीकारक आहे

यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत राऊत यांनी केंद्रावर टीका केली. केंद्रीय पथके दबावाखाली येथे येऊन कार्यवाही करतात आणि हे भारताच्या संघराज्य पद्धतीला हानीकारक आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, ओबीसी आरक्षणाचा मारेकरी काँग्रेसच आहे. तसेच सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेले आहे. पण माझ्या हातात पुन्हा सूत्रे दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

जगात ४ प्रकारचे दु:खी; शॉटगन सिन्हांनी शोधला मोदींशी संबंधित चौथा भन्नाट व्हेरिएंट

दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून, राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वाच्या शहरांत तसेच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावे, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडले. 
 

Web Title: shiv sena sanjay raut replied bjp devendra fadnavis over obc reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.