“देवेंद्र फडणवीसांचे भविष्य उज्ज्वल, संन्यास घेण्याची भाषा शोभत नाही”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 11:26 AM2021-06-28T11:26:05+5:302021-06-28T11:29:52+5:30

देवेंद्र फडणवीस यांनी, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन, असे मोठे वक्तव्य केले होते. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

shiv sena sanjay raut says that bjp devendra fadnavis has bright future | “देवेंद्र फडणवीसांचे भविष्य उज्ज्वल, संन्यास घेण्याची भाषा शोभत नाही”: संजय राऊत

“देवेंद्र फडणवीसांचे भविष्य उज्ज्वल, संन्यास घेण्याची भाषा शोभत नाही”: संजय राऊत

Next
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीसांचे भविष्य उज्ज्वलदेवेंद्र फडणवीसांना संन्यास घेण्याची भाषा शोभत नाहीसंजय राऊत यांनी व्यक्त केले मत

मुंबई: राज्यात आताच्या घडीला आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण या दोन्ही मुद्द्यांवरून भाजप आक्रमक झाला असून, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन, असे मोठे वक्तव्य केले होते. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून, देवेंद्र फडणवीसांचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यांना संन्यास घेण्याची भाषा शोभत नाही, असे म्हटले आहे. (sanjay raut says that devendra fadnavis has bright future)

शनिवार, २६ जून रोजी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वाच्या शहरांत तसेच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावे, यासाठी भाजपने एल्गार केला. यावेळी नागपूर येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले होते. यानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांची गरज आहे, असे म्हटले आहे. 

“ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेले, मात्र मी केंद्रात प्रयत्न करणार”

तर मी स्वतः त्यांची भेट घेईन

देवेंद्र फडणवीस लढवय्ये नेते आहेत. त्यांना संन्यास घेऊ देणार नाही. त्यांची महाराष्ट्र, देशाला गरज आहे. अशी भाषा त्यांना शोभत नाही. चांगल्या नेतृत्त्वाचा राजकारणात तुटवडा आहे. देवेंद्र फडणवीसांसारख्या हरहुन्नरी नेत्यांने फकीर होण्याची भाषा करणे योग्य नाही. संन्यास वगैरे घेण्याची भाषा करू नका, त्यासाठी मी त्यांना स्वत: भेटून सांगेन, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

“देवेंद्र फडणवीस धनगर आरक्षणाबाबतही असंच बोलले होते”; राऊतांचा पलटवार

भाजप-शिवसेनेचे युती सरकारही पाच वर्ष टिकले

महाराष्ट्रात तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे. तिन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, त्यांच्या राजकीय विचारधारा वेगळ्या असल्या तरी किमान समान कार्यक्रमानुसार सरकार सुरु आहे. भांड्याला भांडं लागणारच. भाजप-शिवसेना युती सरकारमध्येही भांड्याला भांडी लागत होती. तरीही सरकार पाच वर्ष टिकले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारही पाच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

संघर्ष नको मग संवादातून मार्ग का काढत नाही?; भाजपचा ठाकरे सरकारला सवाल

दरम्यान, विरोधीपक्षाने जबाबदारीने वागले पाहिजे, ही जनतेची अपेक्षा आहे. पण ती जबाबदारी पाळत नसाल, तर आपण जनतेला ज्ञान देण्यात अपुरे पडत आहोत. आपल्यात कमतरता आहेत, असा याचा अर्थ होतो. सत्ता गेल्यावर त्यांना निराशा आली आहे आहे. याच नैराश्यातून आणि वैफल्यग्रस्ततेतून अशा प्रकारच्या चौकशा सुरू करण्यात आल्या आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी यापूर्वी केला होता. 
 

Web Title: shiv sena sanjay raut says that bjp devendra fadnavis has bright future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.