शिवसेना कार्यकर्त्यांचा कर्नाटक प्रवेशाचा प्रयत्न; कागल पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 11:44 AM2021-03-08T11:44:50+5:302021-03-08T11:45:43+5:30
Belgaum Flag issue: कर्नाटक राज्यात जाण्याचा प्रयत्न केला असता तेथे बंदोबस्तासाठी असणाऱ्या महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाबंदी आदेशाची होळी करण्यात आली.
बाबासो हळिज्वाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोगनोळी : बेळगाव महापालिकेसमोर उभारलेला अनधिकृत ध्वज हटविण्याची मागणी अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील मराठा भाषिकांकडून होत आहे यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने (Maharashtra Ekikaran Samiti) मोर्चे आंदोलने व निवेदनही दिले आहेत तरीही तो ध्वज तसाच उभा असल्याने आज सोमवार दिनांक 8 मार्च रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीनेबेळगावात मोर्चा काढण्याचे आयोजन केले आहे या मोर्चासाठी कोल्हापुरातून बेळगावच्या दिशेने जात असणारे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे संजय पवार यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळी जवळील दूधगंगा नदीवरून कागल पोलिसांनी ताब्यात घेतले. (Maharashtra Ekikaran Samiti on protest in Belgaon)
या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित राहून प्रक्षोभक भाषण करतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहील यासाठी जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी विजय देवणे व त्यांचे सहकारी यांना बेळगाव जिल्हा बंदीचा आदेश लागू केला होता. त्या आदेशाला न जुमानता आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास संजय पवार विजय देवणे हे आपल्या जवळपास 50 कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मोटर सायकलच्या रॅलीने आले.
कर्नाटक राज्यात जाण्याचा प्रयत्न केला असता तेथे बंदोबस्तासाठी असणाऱ्या महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाबंदी आदेशाची होळी करण्यात आली.