"शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी", खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 02:51 PM2021-06-12T14:51:55+5:302021-06-12T14:53:51+5:30

sanjay Raut News: स्थानिक स्वराज्य संस्थेसह लोकसभेची जागा आम्ही लढविण्याची तयारी करणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जळगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

Shiv Sena's readiness to fight on its own, big statement of MP Sanjay Raut | "शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी", खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान

"शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी", खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान

Next

जळगाव - शिवसेनेचे बळ जळगाव जिल्ह्यात आहे. कोणत्याही पद्धतीने निवडणुका लढण्याची तयारी आणि मानसिकता सर्व पदाधिका-यांची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेसह लोकसभेची जागा आम्ही लढविण्याची तयारी करणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जळगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. (Shiv Sena's readiness to fight on its own, big statement of MP Sanjay Raut)

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटी संदर्भात बोलतांना ते म्हणाले की, प्रशांत किशोर हे राजकीय नेते नाहीत. त्यांनी गेल्या वेळी आमच्यासाठी तसेच काॅग्रेससाठी देखील काम केले आहे. ते व्यावसायिक राजनीतकार आहेत. जर कोणी प्रमुख नेते त्यांना भेटत असतील तर त्यांच्या पक्षाच्या विस्तारासाठी भेटली असावे. ही राजकारणातील फार मोठी उलथापालथ आहे असे मी मानत नाही.

 देशातील सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन एक मजबूत आघाडी तयार करणे गरजेचे आहे. पण विरोधी पक्षाची आघाडी ही काॅग्रेस शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. सध्या काॅग्रेस कमकुवत झाली असली तरी देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. केरळ, आसाम, महाराष्ट्र, कर्नाटक यासह काही राज्यांमध्ये त्यांचे आजही चांगले संख्या बळ आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, ममता बॅनर्जी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काही प्रयत्न करीत असतील तर त्याचे दृष्य परिणाम लवकरच पहायला मिळतील. 

शिवसेनेचा विस्तार हा मुंबई-ठाण्यापर्यंतच आहे. मुंबई, ठाण्याच्या बाहेर शिवसेना जाणार नाही आसे एकेकाळी म्हटले जात होते. पण आज कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे मोठे संघटन आहे. लवकरच ५५ चे ११० आमदार करूया. 

 शिवसेना या चार अक्षरांमध्ये चमत्कार आहे. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेच आपण पुढे जात आहात. जळगावमध्ये सत्तांतर होत असताना ते नगरसेवक कुठून आले, कसे आले, हे आता महत्त्वाचे नाही. आज जळगावच्या सुवर्णनगरीचा कोळसा झाला आहे. ही परिस्थिती सुधारली पाहिजे. जो उत्तम पद्धतीने महानगरपालिका चालवतो तो राज्यही चालवू शकतो. मुंबई मनपानंतर आता उद्धव ठाकरे हे राज्य चालवत आहेत, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.   

राज्यात शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वक्तव्य केले आहे. याबाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले की  रामदास आठवले यांना भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हे अधिकार दिले असतील तर पहावे लागेल असे त्यांनी सांगितले. माजी खासदार नीलेश राणे यांनी खासदार राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पगारी कर्मचारी असल्याची टीका केली होती.  या टीकेला उत्तर देतांना खासदार राऊत म्हणाले की माझे घर चालविण्या पुरता मला पगार मिळत आहे. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे असते असे त्यांनी सांगितले.

Web Title: Shiv Sena's readiness to fight on its own, big statement of MP Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.