Sanjay Raut: सहकार खाते अमित शाहंकडे गेल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 11:31 AM2021-07-12T11:31:01+5:302021-07-12T12:33:56+5:30

sanjay raut reaction on Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे नव्या सहकार खात्याची जबाबदारी गेल्याच्या निर्णयाचे संजय राऊतांकडून स्वागत

shivsena leader MP sanjay raut reaction on amit shah's new Ministry of Cooperation | Sanjay Raut: सहकार खाते अमित शाहंकडे गेल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही...

Sanjay Raut: सहकार खाते अमित शाहंकडे गेल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही...

Next
ठळक मुद्दे'राज्यातील सहकारावर गंडांतर येण्याच्या चर्चेमध्ये तथ्य नाही'-शरद पवार

मुंबई: काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर(Cabinet Expansion) देशाच्या सहकार खात्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांच्याकडे देण्यात आली आहे. शाहकडे सहकार खाते गेल्यामुळे महाराष्ट्रातील सहकारावर याचा परिणाम होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. परंतु, या निर्णयाचे शिवसेना नेते संजय राऊत(sanjay raut) यांनी स्वागत केले आहे. अमित शाहंना सहकाराचा अनुभव असल्यामुळे ते या क्षेत्रात काही तरी चांगले करतील, असा विश्वास राऊतांनी बोलून दाखवला. 

संजय राऊत मीडियाशी संवाद साधताना म्हणाले की, केंद्र सरकारला सहकारात काही मदत करायची इच्छा असेल, म्हणून त्यांनी नव्या मंत्रालयाची स्थापना केली आहे. परंतु, सहकार हा राज्याचा विषय आहे. अमित शाहंकडे सहकार खात्याची जबाबदारी गेल्याने घाबरण्याचे काहीच कारण नाही. शाहंना सहकाराचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या मनात काही चांगल्या गोष्टी असतील तर त्या अंमलात आणतील. आम्ही त्याकडे सकारात्मकतेने पाहतो, असे मत संजय राऊत यांनी मांडले आहे. 

'राज्यातील सहकारावर गंडांतर येण्याच्या चर्चेमध्ये तथ्य नाही'
अमित शाहंकडे सहकार खात्याची जबाबदारी गेल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. सहकाराबाबतचे कायदे राज्याच्या विधानसभेमध्ये केलेले आहेत. त्यात केंद्राला हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या नव्याने निमाण करण्यात आलेल्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावर गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही. याबाबत येणाऱ्या बातम्यांनादेखील फारसा अर्थ नाही. सहकार हा विषय घटनेनुसार राज्य सरकारच्या अखत्यारीतला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
 

Web Title: shivsena leader MP sanjay raut reaction on amit shah's new Ministry of Cooperation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.