'...घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा!', नितेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 01:08 PM2021-01-03T13:08:01+5:302021-01-03T13:10:33+5:30

nitesh rane : ईडीविरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरणाची तयारी सुरु आहे. या मोर्चावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

shivsena march agains ed notice nitesh rane criticised | '...घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा!', नितेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

'...घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा!', नितेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

Next
ठळक मुद्देखासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ५ जानेवारीला ईडीकडून चौकशी होणार आहे. तेव्हा शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ईडीविरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरणाची तयारी सुरु आहे. या मोर्चावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

नितेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. "शिवसेना ED ऑफिसच्या बाहेर मोर्चा काढणार म्हणे… हा मोर्चा मराठा आरक्षण साठी निघाला नाही… हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही… हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी म्हणून निघाला नाही… पण वैयक्तिक घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा! महाराष्ट्र धर्म?," असे ट्विट करत नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ५ जानेवारीला ईडीकडून चौकशी होणार आहे. तेव्हा शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ५ जानेवारीला मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर परिसरातून बसेस आणि खासगी गाड्यांनी शिवसैनिक मुंबईत येणार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांत शिवसेना नेत्यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आल्यामुळे शिवसेनेने आता ईडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
संजय राऊत यांच्या वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या ५५ लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती. बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रे घेऊन कार्यालयात येण्यास नोटिशीत सांगण्यात आले होते. हे संपूर्ण प्रकरण HDILशी संबंधित आहे. HDILच्या वाधवान बंधूंना PMC बँक घोटाळ्या प्रकरणी अटक केली होत. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास EOW करत होते. मात्र, पुढे या प्रकरणाचा तपास ईडीकडे सोपवण्यात आला. वाधवान बंधूंचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांचीही चौकशी करण्यात आली आहे. मुंबईच्या गोरेगाव परिसरात एका पुनर्विकास प्रकल्पाचे काम HDIL कडून करण्यात येत होते. त्यात अनियमितता समोर आल्यानंतर वाधवान बंधूंना अटक करण्यात आली.

Web Title: shivsena march agains ed notice nitesh rane criticised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.