वाघाच्या मिशीला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पाहातोय; संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 01:24 PM2021-06-13T13:24:33+5:302021-06-13T13:25:28+5:30
Sanjay Raut: वाघ हा वाघ असतो. त्याच्या मिशिला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पाहातोय मग बघू, असं म्हणत शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
Sanjay Raut: वाघ हा वाघ असतो. त्याच्या मिशिला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पाहातोय मग बघू, असं म्हणत शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. सरकार काम करत असतं पण पक्ष संघटनेला गती मिळावी यासाठीही कार्यकर्ता स्तरावर काम करावं लागतं. कोरोना असला तरी राजकारण थांबत नाही. सत्ता मागच्या पानावरुन पुढे नेत असताना तुम्हाला संघटना बळकट करणं आणि संघटनेच्या तळागळातील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी दौरे करावे लागतात. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसारच शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी मी दौरा करतोय, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.
चंद्रकांत पाटील यांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका करताना आमची दोस्ती वाघाशी होती. पिंजऱ्यातील वाघाशी नाही, असं विधान केलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांचं मन लहानमुलासारखं आहे. ते निष्पाप, निष्कलंक आणि निष्कपट नेते आहेत. वाघाच्या मिशीला हात लावायलाही हिंमत लागते. या मी वाट पाहातोय, असं म्हटलं आहे.
५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री ही 'कमिटमेंट'
राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या वाटाघाटी संदर्भातील वावड्यांबाबत बोलताना संजय राऊत यांनी राज्यात शिवसेनेचाच ५ वर्ष मुख्यमंत्री राहिल. त्यात ना कोणता वाटा किंवा घाटा होणार नाही. तशी कमिटमेंटच सुरूवातीला दिली गेली आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.