'दिल्लीत कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा; कोणाचा राजीनामा मागणार, शरद पवारांचा की ज्यो बायडनचा?', राऊतांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 06:37 PM2021-01-26T18:37:11+5:302021-01-26T18:49:41+5:30
Sanjay Raut And Modi Government : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई - दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. आज शेतकऱ्यांकडून दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. मात्र काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीमधील आयटीओ परिसरात पोलीस आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष पेटल्याचंही दिसून आलं होतं. तर दुसरीकडे एका आंदोलकाने वेगाने ट्रॅक्टर आणत रस्त्यावर उभ्या पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. याच दरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे असं म्हणत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे. या अराजकासाठी दिल्लीत ठरवून पायघड्या घातल्या गेल्या. कोणाचा राजीनामा मागणार? सोनिया गांधी. ममता बॅनर्जी. उद्धव ठाकरे. शरद पवार की ज्यो बायडनचा? इस बात पर त्यागपत्र... राजीनामा तो बनता है साहेब... जय हिंद" असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे. या अराजकासाठी दिल्लीत ठरवून पायघड्या घातल्या गेल्या.कोणाचा राजीनामा मागणार?सोनीया गांधी. ममता बॅनर्जी. ऊध्दव ठाकरे.शरद पवार की ज्यो बाईडनचा? इस बात पर त्यागपत्र...राजीनामा तो बनता है साहेब..
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 26, 2021
जय हिंद
"ही लोकशाही नाही, सरकार याच दिवसाची वाट पाहत होतं का?" संजय राऊतांचा घणाघात
आज सुरू असलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान आंदोलक शेतकरीदिल्लीतील लाल किल्ल्यावर धडकले आहेत. शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला दोषी ठरवलं आहे. सरकार याच दिवसाची वाट पाहत होती का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, सरकार याच दिवसाची वाट पाहत होती का. सरकारने शेवटपर्यंत लाखो शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले नाही. ही कुठल्या प्रकारची लोकशाही आमच्या देशात वाढत आहे. ही लोकशाही म्हणता येत नाही. काही औरच चालले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
क्या सरकार इसी दिनका बेसब्रीसे इंतजार कर रही थी?
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 26, 2021
सरकारने आखीरतक लाखो किसानों की बात नही सुनी.
ये किस टाईप का लोकतंत्र हमारे देशमे पनप रहा है?
ये लोकतंत्र नही भाई..
कुछ और ही चल रहा है.
जय हिंद
संजय राऊत पुढच्या ट्विटमध्ये म्हणाले की, जर सरकारला वाटले असते तर हिंसा थांबवता आली असती. दिल्लीमध्ये जे सुरू आहे त्याचे समर्थन करता येणार नाही. कुणीही असो लाल किल्ला आणि तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही. मात्र वातावरण का बिघडले. सरकार शेतकरी विरोधी कायदे का रद्द करत नाही आहे. कुठले अदृश्य हात राजकारण करत आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. कृषी कायद्यांना विरोध करत असलेल्या शेतकरी आंदोलकांनी आज ट्रॅक्टर मोर्चा काढला. मात्र सुरुवातीलाच हे आंदोलन नियंत्रणाबाहेर गेले असून, आंदोलक शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत प्रवेश करत लाल किल्ल्यावर कब्जा केला आहे. तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला झेंडा फडकवला आहे.
"शेतकरी आंदोलन हाताळण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी"https://t.co/D9gW3cMHvO#BalasahebThorat#NarendraModi#Congress#Modi#FarmersProstests#TractorRallypic.twitter.com/hSzgpjw6ZT
— Lokmat (@MiLOKMAT) January 26, 2021
Farmers’ Tractor Rally : दिल्ली पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे मृत्यू झाल्याचा आंदोलकांचा दावाhttps://t.co/PsOFquR33p#Delhi#FarmersProstests#TractorMarchDelhi#tractorParade#Internet
— Lokmat (@MiLOKMAT) January 26, 2021