Pratap Sarnaik News: प्रताप सरनाईक बेपत्ता? ईडी, सीबीआयची लोणावळ्यातील रिसॉर्टवर धाड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 01:02 PM2021-05-18T13:02:08+5:302021-05-18T13:02:58+5:30
ED, CBI Raid in Lonavla, Pratap Sarnaik search :मी स्वतः ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे, नुसता फोन केलात तरी शंभर वेळा हजर होईन, असे प्रताप सरनाईकांनी ईडीला ठणकावून सांगितल्याचे म्हटले होते.
Pratap Sarnaik: मुंबई : बेहिशेबी मालमत्तांप्रकरणी गेल्या काही महिन्यांपूर्वी ईडीच्या आणि सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik ) यांच्या शोधासाठी ईडी (ED) व सीबीआयने (CBI) लोणावळ्यामध्ये धाडी टाकल्या आहेत. (ED, CBI Serching Shivsena Mla Pratap Sarnaik in Lonavla; Raid on resort.)
ईडीची काडी कोणी व कशासाठी केली, हे जनतेला कळून चुकलेले आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात परखड भूमिका मांडली आहे. मी असल्या चौकशांनी घाबरून महाराष्ट्र हिताची जबाबदारी बाजूला ठेवणार नाही. मी लढणारा आहे आणि लढत राहणार. मी स्वतः ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे, नुसता फोन केलात तरी शंभर वेळा हजर होईन. पण मुलांचा काही संबंध नसताना त्यांना कशाला बोलावता असे, आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये म्हटले होते.
आता ईडी आणि सीबीआय प्रताप सरनाईकांचा शोध घेत आहे. प्रताप सरनाईक बेपत्ता झाल्याचे बोलले जात आहे. ईडीने आणि सीबीआयने लोणावळा येथील एका रिसॉर्टवर धाड टाकली आहे. काहीवेळापूर्वीच दोन्ही तपास यंत्रणांचे अधिकारी या रिसॉर्टवर पोहोचले आहेत.
Pratap Sarnaik GAYAB!!??
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 18, 2021
प्रताप सरनाईक कुठे आहात!!?? @BJP4Maharashtra
भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक गायब असल्याचा आरोप केला आहे. ईडीने सरनाईकांना ताब्यात घेण्यासाठी शोध सुरु केला आहे. याआधी गेल्या वर्षी ईडीने प्रताप सरनाईकांच्या मुलाला ताब्यात घेतले होते.
किरिट सोमय्यांचे आरोप....
प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन या इमारतीला पालिकेचा परवाना नाही. ही इमारत अनधिकृत आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच ठाण्यातील रेमंड कंपनीसमोर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी 13 मजल्याचे दोन टॉवर बांधले आहेत. OC न घेताच सर्व फ्लॅटची विक्री केली असा आरोप सोमय्या यांनी केला. 2008 साली ठामपा ने सदर बांधकामाला अनधिकृत ठरवले व तोडक कारवाईचे आदेश दिले परंतु आजतागायत त्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त जात असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. प्रताप सरनाईक यांनी सामान्य नागरिकांची फसवणूक केली असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील किरीट सोमय्या यांनी केली यापूर्वी केली होती.