सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत हेच युतीचे उमेदवार- जठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 05:08 PM2019-04-01T17:08:18+5:302019-04-01T17:10:54+5:30
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार विनायक राऊत हेच असणार आहेत.
सावंतवाडी : सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार विनायक राऊत हेच असणार आहेत. त्यामुळे भाजप घटक पक्षाचा अन्य कोण ही उमेदवार नसून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत अनेक घडामोडी घडतील, असे सूचक वक्तव्य भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केले वरिष्ठ पातळीवर तशा हालचाली सुरू असून, मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्हयात आल्यावर याबाबत अधिकृत भूमिका जाहीर करतील, असे जठार यांनी सांगितले. हम आपके है कोन असे म्हणणारी शिवसेना-भाजप आता हम साथ साथ है असे म्हणत आहे. त्यामुळे अधिकृत उमेदवार विनायक राऊत विजय होणार आहेत.त्यामुळे कोण मोदींच्या नावावर मते मागत असेल तर ते चुकीचे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी राजन तेली,शिवसेना संपर्क प्रमुख शैलेश परब,शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी,भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग,शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ,शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत,अन्नपूर्णा कोरगावकर,श्वेता कोरगावकर,मनोज नाईक,शब्बीर मणियार,निशांत तोरसकर,रश्मी माळवडदे,परिणिता वर्तक,अपर्णा कोठावळे,प्रथमेश तेली,तसेच भाजप शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.