Cabinet Committee: स्मृती इराणी, ज्योतिरादित्य शिंदे यांना मंत्रिमंडळ समित्यांमध्ये स्थान; नारायण राणेंना काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 11:07 AM2021-07-13T11:07:54+5:302021-07-13T11:09:11+5:30
Cabinet Committee appointment: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani), किरण रिजिजू, अनुराग ठाकूर यांच्यासारख्या युवा चेहऱ्याबरोबरच महाराष्ट्राचे हेवीवेट नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनादेखील मंत्रिमंडळ समितीमध्ये जागा मिळाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कॅबिनेट विस्तार (Centre Cabinet) केला आहे. यामध्ये मोठे फेरबदल करताना १२ मंत्र्यांना नारळ दिला होता. या मंत्रिमंडळात जागा मिळालेले काही युवा नेते आणि प्रमोशन मिळविणारे मंत्री यांना आता कॅबिनेट समित्यांमध्ये (Cabinet Committee) स्थान देण्यात आले आहे. यामध्ये भूपेंद्र यादव. सर्वानंद सोनोवाल, मनसुख मंडाविया यांच्यासह अन्य मंत्र्यांचा समावेश आहे. ( Cabinet Committee appointed by PM Narendra Modi; Jyotiraditya Scindia, Smriti Irani Narayan rane got post.)
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani), किरण रिजिजू, अनुराग ठाकूर यांच्यासारख्या युवा चेहऱ्याबरोबरच महाराष्ट्राचे हेवीवेट नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनादेखील मंत्रिमंडळ समितीमध्ये जागा मिळाली आहे. रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर सारखे मोठे चेहरे कॅबिनेटमधून बाहेर गेले आहेत. यामुळे कॅबिनेट समित्यांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत.
Union Minister for Woman and Child Development, Smriti Irani, was also included in the Cabinet Committee on Political Affairs and Civil Aviation Minister Jyotiraditya Scindia in the Cabinet Committee on Investment and Growth.
— ANI (@ANI) July 13, 2021
कोणाला कोणती समिती...
संसदीय कामकाज समितीवर (Parliamentary Affairs) अर्जुन मुंडा, विरेंद्र कुमार, किरण रिजिजू, अनुराग ठाकुर यांना घेण्यात आले आहेत.
पॉलिटिकल अफेयर्स (Political Affairs) शी संबंधित महत्वाच्या समितीवर स्मृति ईरानी, सर्वानंद सोनोवाल, गिरिराज सिंह, मनसुख मंडाविया, भूपेंद्र यादव याना घेण्यात आले आहे. या समितीचे अध्यक्ष खुद्द पंतप्रधान आहेत.
इन्वेस्टमेंटआणि ग्रोथ (Investment and growth) शी संबंधीत समितीवर नारायण राणे, ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia), अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती झाली आहे.
रोजगार आणि स्किलशी संबंधीत समितीवर धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, हरदीप पुरी, आरसीपी सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समितीदेखील पंतप्रधानांच्या नेतृत्वात आहे.