...म्हणून मी वंचित बहुजन आघाडीला दिलेला बिनशर्त पाठींबा नाकारला : काेळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 08:21 PM2019-03-17T20:21:15+5:302019-03-17T20:41:27+5:30

माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीला बिनशर्त दिलेला पाठींबा नाकारण्याबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे.

... so I denied the support given to the vanchit bahujan aghadi : Kolse Patil | ...म्हणून मी वंचित बहुजन आघाडीला दिलेला बिनशर्त पाठींबा नाकारला : काेळसे पाटील

...म्हणून मी वंचित बहुजन आघाडीला दिलेला बिनशर्त पाठींबा नाकारला : काेळसे पाटील

Next

पुणे : माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीला बिनशर्त दिलेला पाठींबा नाकारण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. फेसबुकवर पाेस्ट लिहीत त्यांनी पाठींबा नाकारल्याचे कारण सांगितले आहे. गेली पाच वर्षे सातत्याने घेतलेली, खूनी मोदी शाह विरूध्दच्या ठाम भूमिकेला, जी वंचित आघाडी त्याला तडा देत आहे याची खात्री झाल्यावर पाठींबा नाकारला असल्याचे काेळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

वंचित बहुजन आघाडीला माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील यांनी बिनशर्त पाठींबा दिला हाेता. औरंगाबादच्या जागेवर बी. जे. काेळसे पाटील यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चाही मधल्या काळात सुरु हाेत्या. काही दिवसांपूर्वी अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी काॅंग्रेसशी आघाडी करण्याचे सर्व पर्याय बंद झाल्याचे जाहीर केले हाेते. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने 37 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. औरंगाबाद मधून एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

आपल्या फेसबुक पाेस्टमध्ये काेळसे पाटील म्हणतात. ''वंचित बहुजन आघाडीला दिलेला बिनशर्त पाठींबा नाकारला आहे. काॅंग्रेस हा एकमेव पक्ष जाे जातीयवादी, विषारी विचारांच्या संघप्रणित भाजापाल राेखू शकताे, त्यांच्याबराेबर आघाडी करण्यासाठी शेवटचा पण अनेक अयशस्वी प्रयत्नांपैकी एक शेवटचा प्रयत्न केला. मी गेली पाच वर्षे सातत्याने घेतलेली, खूनी मोदी शाह विरूध्दच्या ठाम भूमिकेला, जी वंचित आघाडी त्याला तडा देत आहे याची खात्री झाल्यांवर त्यांचा दिलेला पाठिंबा मी ठामपणें नाकारलेला आहे. तसं त्यांनी मला सुरूंवातीपासूनच, अनेकदा काॅंग्रेसबरोबर चर्चा करण्याचे कबूलही केलं होतं आणि मी स्वखुशीनें ती मध्यस्थी काल पर्यंत करीतही होतो. परंतु परवाच ॲड. बाळासाहेबांनी सर्व उमेदवार जाहीर करून चर्चेला पूर्ण विराम दिलेला आहे. त्यामुळे माझ्या हातून कळत नकळत देखील चूक होऊन मोदीला मदत होता कामा नये हाच माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.''

 

Web Title: ... so I denied the support given to the vanchit bahujan aghadi : Kolse Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.