...म्हणून महाविकास आघाडी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेत नाही, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 07:44 PM2021-07-10T19:44:47+5:302021-07-10T19:45:27+5:30

Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

... So, Mahavikas Aghadi does not hold elections for the post of Assembly Speaker, Devendra Fadnavis stated the exact reason | ...म्हणून महाविकास आघाडी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेत नाही, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण

...म्हणून महाविकास आघाडी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेत नाही, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण

Next

मुंबई/नागपूर - नाना पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्षपद सोडून अनेक महिने लोटले तरी अध्यक्षपदाची निवडणूक अद्याप होऊ शकलेली नाही. नुकत्याच आटोपलेल्या पावसाळी अधिवेशनातही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा विषय गुंडाळून ठेवला होता. मात्र आता विशेष अधिवेशन बोलावून विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाईल, अशी चर्चा सुरू आहे. तर तालिका अध्यक्ष म्हणून पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित करणारे भास्कर जाधव हे सुद्धा विधानसभा अध्यक्षपदासाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे. दरम्यान, याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारले असता त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. (So, Mahavikas Aghadi does not hold elections for the post of Assembly Speaker, Devendra Fadnavis stated the exact reason)

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेद्र फडणवीस म्हणाले की, भास्कर जाधव यांना विधानसभेचे अध्यक्ष व्हायचे असेल तर आमच्याकडून त्यांना शुभेच्छा. मात्र अध्यक्षपद मिळाल्यास त्यांनी निष्पक्षपणे त्या पदावर राहावं, हीच आमची इच्छा आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदावरून एकमत झालेले नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची निवड होत नाही आहे. महाविकास आघाडीमध्ये या विषयावर एकमत झालं असतं तर एवढ्यात निवडणूक झाली असती, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

आर्टिफिशियल मेजॉरिटी निर्माण करून अशी निवडणूक घेता येत नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून निवडणुकीचा घाट घातला जाणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास सत्तेत असलेल्या तिनही पक्षांचे नुकसान होणार आहे, त्यामुळे ते मध्यावधी निवडणुकीच्या मार्गाला जाणार नाहीत, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.  

Web Title: ... So, Mahavikas Aghadi does not hold elections for the post of Assembly Speaker, Devendra Fadnavis stated the exact reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.