...तर त्यांनी एकदा आरशात बघावं, सचिन वाझे प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 05:28 PM2021-03-14T17:28:42+5:302021-03-14T17:36:36+5:30

Devendra Fadnavis lashed out Sanjay Raut over Sachin Vaze case : आज ज्यांना अटक झाली आहे. तेच या प्रकरणाचा तपास करत होते. ही बाब गंभीर आहे.

... so they should look in the mirror once, Devendra Fadnavis lashed out Sanjay Raut over Sachin Vaze case | ...तर त्यांनी एकदा आरशात बघावं, सचिन वाझे प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

...तर त्यांनी एकदा आरशात बघावं, सचिन वाझे प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

Next

मुंबई - पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze case)  यांच्यावर एनआयएकडून झालेल्या अटकेच्या कारवाईनंतर राज्यात सत्ताधारी शिवसेना (Shiv sena) आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये (BJP) राजकारण पेटले आहे. हा प्रकार म्हणजे "केंद्रीय यंत्रणेला राज्यात घुसवून मुंबई पोलिसांचं खच्चीकरण करण्याचा, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. आता या आरोपाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खरमरीत शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. (... so they should look in the mirror once, Devendra Fadnavis lashed out Sanjay Raut over Sachin Vaze case)

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले की, आज ज्यांना अटक झाली आहे. तेच या प्रकरणाचा तपास करत होते. ही बाब गंभीर आहे. आता एवढे पुरावे समोर आल्यावर मुंबई पोलिसांवर अविश्वास, महाराष्ट्रद्रोह वगैरे म्हणाणाऱ्यांनी आधी स्वत: आरशात पाहिले पाहिजे. एवढं भयानक कुणी वागत असेल, त्यातून मुंबई पोलिसांची प्रतिमा उजळते का याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. तसेच राज्य खिळखिळे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप हा  हास्यास्पद आणि दुधखुळेपणाचा आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

विरोधी पक्ष नेता म्हणून माझं काम आहे. अशा प्रकारची माहिती मला घेऊन मांडण्याची आवश्यकता पडता कामा नये. मात्र ती गरज का भासली याचं उत्तर संजय राऊत यांनी दिलं पाहिजे. एतकी ढळढळीत केस आहे. पोलिस कथित रूपाने प्लॅन करतात. पोलिसांच्या अशा प्लॅनिंगमध्ये एका व्यक्तीची हत्या होतेय. या सगळ्या गोष्टी होत असतील आणि त्या दाबण्याचा प्रयत्न होत असेल. तर मला वाटतं या यंत्रणेला संजय राऊत यांनी प्रश्न विचारला पाहिले, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.  

दरम्यान, सचिन वाझे यांचे निलंबन हे न्यायालयाच्या आदेशानुसार झाले होते. राज्यात युतीची सरकार असताना शिवसेनेने सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा आग्रह केला होता. मात्र तेव्हा मी काही कायदेशीर सल्ले घेऊन असे करणे योग्य नसल्याचे तोंडी सांगितले होते. मात्र आता कोरोनाकाळात आम्ही निलंबित पोलिसांना सेवेत घेतोय, असे सांगून राज्य सरकारने सचिन वाझे यांनाही सेवेत सामावून घेतले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Web Title: ... so they should look in the mirror once, Devendra Fadnavis lashed out Sanjay Raut over Sachin Vaze case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.