सोशल मीडियावरही रंगलाय निवडणुकीचा फड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 12:37 AM2019-04-18T00:37:44+5:302019-04-18T00:38:02+5:30

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार आणि प्रसारांच्या सभांनी मैदाने गाजत असतानाच यापासून सोशल मीडिया कसा दूर राहील.

On the social media, the colorful elections are in full swing | सोशल मीडियावरही रंगलाय निवडणुकीचा फड

सोशल मीडियावरही रंगलाय निवडणुकीचा फड

Next

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचार आणि प्रसारांच्या सभांनी मैदाने गाजत असतानाच यापासून सोशल मीडिया कसा दूर राहील. मैदाने, रस्ते आणि गल्लीबोळ उमेदवारांकडून पालथे घातले जात असतानाच, उमेदवारांच्या ‘मीडिया सेल’कडून सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला जात असून, निवडणूक आयोगाकडूनही सोशल मीडियावर मतदारांना मतदान करण्यासाठीचे सातत्याने आवाहन केले जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी गुरुवारी मतदान होणार आहे. गुरुवारी मतदान होत असलेल्या मतदारसंघातील मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे, म्हणून निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली आहे. मतदानाचा टक्का वाढावा, म्हणून सोशल मीडियावर हॅशटॅग जोशात आहेत. महत्त्वाचे म्हणजे महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे, म्हणून आयोग आग्रही असून, याबाबत विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्तीकडून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.
आवाहन
लोकसभा निवडणूक २०१९च्या आपल्या मतदारसंघातील निवडणुकांची तारीख पाहा, आवर्जून मतदान करा.
आपले मतदानाचे कर्तव्य नक्की बजावा.
मतदान म्हणजे आपल्या देशाच्या विकासाचा पाया रोवणे.
निश्चय करा आगामी निवडणुकीत कोणतेही कारण न देता मतदान करण्याचा.
आपल्याला मिळालेला मतदानाचा अधिकार वाया घालवू नका.
आगामी लोकसभा निवडणुकीत मतदाराची भूमिका जरूर निभावा.
अवश्य मतदान करा.
>मतदाराकडे जर वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र नसेल, तर मतदाराने कोणते दस्तऐवज ओळखपत्र म्हणून मतदान केंद्रावर सादर करावे; याबाबत माहिती दिली जात आहे.
>#लोकसभानिवडणूक
#लोकसभानिवडणूक२०१९
#मतदान
#माझेमतअमूल्य
#मतदार
#मतदान

Web Title: On the social media, the colorful elections are in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.