"फडणवीस सरकार वाचवण्यासाठी काही पोलीस अधिकारी आमदारांवर आणत होते दबाव", शिवसेनेचा दावा

By बाळकृष्ण परब | Published: September 21, 2020 07:56 AM2020-09-21T07:56:37+5:302020-09-21T12:10:43+5:30

फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार जाणार नाही या भ्रमात येथील प्रशासन निवडणुकीआधाी आणि नंतर काही काळ होते. ते त्याच भ्रमात तरंगत होते. प्रशासनावर फडणवीस सरकारचा अंमल होता आणि पुन:पुन्हा आम्ही येणार या विधानाची धुंदी होती.

some police officers were putting pressure on MLAs to save the Devendra Fadnavis government - Shiv sena | "फडणवीस सरकार वाचवण्यासाठी काही पोलीस अधिकारी आमदारांवर आणत होते दबाव", शिवसेनेचा दावा

"फडणवीस सरकार वाचवण्यासाठी काही पोलीस अधिकारी आमदारांवर आणत होते दबाव", शिवसेनेचा दावा

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या मर्जीत राहण्यासाठी काही पोलीस अधिकारी काही लहान पक्षांच्या आणि अपक्ष आमदारांना वेगवेगळ्या पद्धतीने जाळ्यात ओढत होते आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करत होतेबहुमत सिद्ध करून द्यायची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते

मुंबई - राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याचे विधान  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केले होते. त्यानंतर त्याबाबत सारवासारव केली होती. त्यानंतर आता शिवसेनेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधूनही काही गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. भल्या पहाटे शपथ घेतलेल्या फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करता यावे यासाठी काही अधिकारी राबत होते. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत राहण्यासाठी काही पोलीस अधिकारी काही लहान पक्षांच्या आणि अपक्ष आमदारांना वेगवेगळ्या पद्धतीने जाळ्यात ओढत होते. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करत होते, असा दावा सामनात आज प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखामधून करण्यात आला आहे.

सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटले आहे की, प्रशासन हे निवडून येणाऱ्या लोकनियुक्त सरकारचे असते. एखाद्या राजकीय पक्षाचे नसते. सरकार बदलताच भलेभले अधिकारी टोप्या फिरवतात. महाराष्ट्रातील प्रशासन हे देशात उत्तम आहे. प्रोफेशनल म्हणतो अशा पद्धतीचा अधिकारी वर्ग महाराष्ट्राला लाभला आहे. सरकार पाडण्याची क्षमता त्यांच्यात नाही. राज्याची ती परंपरा नाही. मात्र जर एखाद्या मंत्र्याला असं वाटत असेल की अधिकारी सरकार पाडत आहेत, तर ते सरकार अत्यंत ढिसाळ पायावर उभे् आहे, असे जनतेला वाटू शकते.

फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार जाणार नाही या भ्रमात येथील प्रशासन निवडणुकीआधाी आणि नंतर काही काळ होते. ते त्याच भ्रमात तरंगत होते. प्रशासनावर फडणवीस सरकारचा अंमल होता आणि पुन:पुन्हा आम्ही येणार या विधानाची धुंदी होती. त्यामुळे पोलीस, मंत्रालय, महसूल खाते एकजात संघधुंदीत गुंग झाले होते. अनेक नेमणुका ह्या संघ परिवाराच्या शिफारशीने किंवा हस्तक्,एपाने होत असत. पोलीस अधिकारी, आयुक्त, सरकारी वकिलांच्या नेमणुकांत हे सर्रास घडत होते. ही व्यवस्था यापुढेही अशीच निरंकुश सुरू राहणार असेच वातावरण असल्याने पोलीस नागरी सेवेतील अधिकारी त्याच व्यवस्थेच्या पांगुळगाड्यावर बसून प्रवास करत होते. पण १०५ आमदारांची ताकद असूनही भाजपा सरकार बनवू शकला नाही, हे सत्य स्वीकारायला त्यांना वेळ लागला, असा टोला सामनामधून लगावण्यात आला आहे

सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करणारे अधिकारी कोण यापेक्षा काही झाले तरी भाजपाचे सरकार बनले पाहिजे असे मानणारे सहानुभूतीदार कोण ते महत्त्वाचे आहे. पहाटे पहाटे सरकार स्थापन करण्याचा सोहळा पार पडला त्या गुप्त कटात काही अधिकाऱ्यांचा सहभाग असायलाच हवा. हे सर्व नाट्य वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर घडले. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत राहण्यासाठी काही पोली अधिकारी काही लहान पक्षांच्या आणि अपक्ष आमदारांना वेगवेगळ्या पद्धतीने जाळ्यात ओढत होते. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करत होते. गुप्तचर खात्यानेही याकामी विशेष कामगिरी बजावली हे सत्यच आहे. बहुमत सिद्ध करून द्यायची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते. मात्र फडणवीस सरकार कोसळले आणि महाविकास आघाडीचे सरकार यायचे ते आलेच.

सहानुभूतीदार अधिकारी मंडळाच्या भरवशावर कुणी सरकार पाडण्याचे मनसुबे पाहत असतील तर ते वेडगळपणाचे ठरेल. यातील काही अधिकारी आजही उच्चपदावर आहे. ठाकरे सरकार येऊ नये म्हणून उघड प्रयत्न करूनही आपले कोणी काय वाकडे केले, या थाटात त्यांचा वापर असतो. सरकारला धोका असतो तो याच प्रवृत्तीपासून. अशा प्रवृत्तींवर लक्ष ठेवणे हे गृहखात्याचे काम आहे. ते त्यांनी पार पाडले तर सरकारचे भवितव्य उत्तम आहे. सरकार पाडण्याचा प्रयत्न कोणताही अधिकारी करत नाही. के फक्त मनसुबेच ठरतात. पण अस्तनीतील निखारे हे असतातच सावधगिरी बाळगावीच लागेल, असा सल्लाही सामनामधून देण्यात आला आहे.

लोकमतला दिलेल्या मुलाखतील काय म्हणाले होते  अनिल देशमुख

 

अनिल देशमुख यांची मुलाखत

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

 

Web Title: some police officers were putting pressure on MLAs to save the Devendra Fadnavis government - Shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.