"...अदानींच्या विमानामधून उड्डाण करणारे हे सज्जन शेतकऱ्यांचे हितचिंतक"; फोटो शेअर करत मोदींना सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 07:46 PM2021-06-29T19:46:26+5:302021-06-29T19:52:34+5:30

SP Leader I P Singh Slams PM Narendra Modi : समाजवादी पक्षाचे नेते आय. पी. सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

sp leader i p singh slams pm modi said not rakesh tikait man in adani airplane is farmer supporter | "...अदानींच्या विमानामधून उड्डाण करणारे हे सज्जन शेतकऱ्यांचे हितचिंतक"; फोटो शेअर करत मोदींना सणसणीत टोला

"...अदानींच्या विमानामधून उड्डाण करणारे हे सज्जन शेतकऱ्यांचे हितचिंतक"; फोटो शेअर करत मोदींना सणसणीत टोला

googlenewsNext

नवी दिल्ली - गेल्या कित्येक महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहे. शेतकरी आंदोलनाला आता तब्बल सात महिने पूर्ण झाले. गेल्या सात महिन्यांपासून केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आंदोलन केलं जात आहे. याच दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांना अटक झाल्याची अफवाही पसरली होती. मात्र नंतर टिकैत यांना अटक करण्यात आली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

शेतकरी आंदोलनातील काही नेत्यांच्या दाव्यानुसार राकेश टिकैत हे शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने नसल्याचा आरोप केला जातो. यावरुनच समाजवादी पक्षाचे नेते आय. पी. सिंह (SP Leader I P Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार हल्लाबोल केला आहे. सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोदींचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानात बसल्याचं दिसत आहे. मोदींसोबतच उद्योगपती गौतम अदानीसुद्धा या विमानातून प्रवास करत असल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करताना सिंह यांनी "टिकैत शेतकऱ्यांचं हित जपणारे नेते नाहीत, अदानींच्या विमानामधून उड्डाण करणारे हे सज्जन शेतकऱ्यांचे हितचिंतक आहेत" असा सणसणीत टोला लगावला आहे. 

आय. पी. सिंह यांनी पुन्हा नरेंद्र मोदींचा जुना फोटो ट्विट केल्यानंतर त्यावरही अनेकांनी प्रतिक्रिया दिल्यात. सिंह यांनी याआधीही मोदींवर निशाणा साधला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींविषयी प्रश्न विचारला आहे. काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काळात जनतेला कसा दिलासा दिला जात होता, याचा हवाला देत प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावर केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. "संकटाच्या वेळीही केंद्राने पेट्रोल-डिझेलवर कराच्या रुपात देशवासीयांकडून 4 लाख कोटी केले वसूल" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

"संकटाच्या वेळीही केंद्राने पेट्रोल-डिझेलवर कराच्या रुपात देशवासीयांकडून 4 लाख कोटी केले वसूल"

प्रियंका गांधी यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कासंदर्भात मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील करात 12 पट वाढ करुन जनतेची लूट केली जात आहे. "2013 साली जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 101 डॉलर्स होते तेव्हा त्यावेळी देशातील लोकांना पेट्रोल 66 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 51 रुपये प्रति लिटर दराने मिळत होते. त्यावेळी केंद्र सरकार पेट्रोल प्रति लीटर 9 रुपये तर डिझेलवर 3 रुपये प्रति लीटर कर आकारत होती. पण सन 2021 मध्ये केंद्र सरकार आपल्याकडून पेट्रोल प्रतिलिटर 33 रुपये आणि डिझेलवर 32 रुपये कर वसूल करत आहे."

"भाजपा सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 12 पट वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असताना देशवासीयांना त्याचा फायदा का देण्यात आला नाही? 2014 पासून कर वसुलीत 300 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ योग्य आहे का? केंद्र सरकारने 7 वर्षात पेट्रोलियम उत्पादनांवरील करातून 21.5 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. पण त्या बदल्यात मध्यमवर्गीय, गरीब आणि व्यापारी वर्गाला काय मिळाले? संकटाच्या वेळीसुद्धा पेट्रोल आणि डिझेलवरील कराच्या रुपात केंद्र सरकारने देशवासीयांकडून सुमारे 4 लाख कोटी रुपये वसूल केले" असं प्रियंका यांनी म्हटलं आहे. 

Web Title: sp leader i p singh slams pm modi said not rakesh tikait man in adani airplane is farmer supporter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.