पासवानांच्या पक्षात उभी फूट, स्वकीयांनीच केला चिराग यांचा गेम, जाणून घ्या कोण आहेत पशुपती पारस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 10:16 AM2021-06-14T10:16:15+5:302021-06-14T10:17:10+5:30

Split in Lok Janshakti Party: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून, दिवंगत नेते रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीमध्ये स्वपक्षीयांनीच फूट पाडली आहे. रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान या घडामोडीत एकटे पडले आहे.

Split in Lok Janshakti Party, Find out who are Pashupati Pars | पासवानांच्या पक्षात उभी फूट, स्वकीयांनीच केला चिराग यांचा गेम, जाणून घ्या कोण आहेत पशुपती पारस

पासवानांच्या पक्षात उभी फूट, स्वकीयांनीच केला चिराग यांचा गेम, जाणून घ्या कोण आहेत पशुपती पारस

Next

पाटणा - बिहारच्याराजकारणात मोठी उलथापालथ घडली असून, दिवंगत नेते रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीमध्ये स्वपक्षीयांनीच फूट पाडली आहे. रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान या घडामोडीत एकटे पडले आहे. लोकजनशक्ती पार्टीच्या सहा पैकी पाच खासदारांनी चिराग पासवान यांच्याविरोधात बंडाचा झेंडा फडकावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व बंडाळीचे नेतृत्व अन्य कुणी नाही तर रामविलास पासवान यांचे बंधू आणि चिराग पासवान यांचे काका पशुपती पारस हे करत आहेत. 

आज आपण जाऊन घेऊयात की, पशुपती पारस कोण आहेत आणि त्यांची नेमकी कोणती राजकीय रणनीती आहे त्याबाबत. पशुपती कुमार पारस हे लोकजनशक्ती पार्टीचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष दिवंगत रामविलास पासवान यांचे भाऊ आणि पक्षाचे सध्याचे अध्यक्ष चिराग पासवान यांचे काका आहेत. पशुपती पारस हे अलौली मतदारसंघातून पाचवेळी आमदार म्हणून निवडून आळे आहेत. त्यांनी १९७७ मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती. तेव्हापासून ते वेगवेगळ्या पक्षांमधून प्रवास केल्यानंतर आता लोकजनशक्ती पार्टीकडून निवडणूक लढवत होते. त्यांनी बिहार सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले आहे. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी हाजीपूर मतदारसंघातून विजय मिळवत लोकसभेत प्रवेश केला होता.  

मिळत असलेल्या माहितीनुसार खासदार पशुपती पारस यांच्या नेतृत्वामध्ये पक्षातील अन्य चार खासदारही पक्षापासून वेगळे होण्याची तयारी करत आहेत. हे सर्व खासदार जेडीयूच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. पशुपती पारस यांचे नितीश कुमार यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते जेडीयूमध्ये सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहेत. मात्र पशुपती पारस यांनी बंडखोरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. 

रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोकजनशक्ती पार्टीमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान, रविवारी घडलेल्या घडामोडींमध्ये पाच बंडखोर खासदारांची बैठक झाली. हे सर्वजण चिराग पासवान यांच्या कार्यशैलीवर नाराज होते. हे खासदार आज लोकसभा अध्यक्षांसोबत बैठक घेण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, बंडखोर खासदारांच्या गटांनी चिराग पासवान यांना लोकजनशक्ती पार्टीच्या संसदीय दलाच्या प्रमुखपदावर हटवले आहे. तसेच लोकजनशक्ती पार्टीच्या अध्यक्षपदावरूनही चिराग पासवान यांची उचलबांगडी केली आहे. ज्या पाच खासदारांनी बंडखोरी केली आहे त्यामध्ये पशुपती पारस, प्रिंस, महबूब अली कैसर, वीणा देवी आणि चंदन सिंह यांचा समावेश आहे.  

Web Title: Split in Lok Janshakti Party, Find out who are Pashupati Pars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.