पुणे महापालिकेच्या मुंढव्यातील पोटनिवणुकीला सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 02:39 PM2018-04-06T14:39:09+5:302018-04-06T14:40:49+5:30

चंचला कोद्रे यांच्या निधनामुळे कोंढवा-मगरपट्टा प्रभागातील जागा रिक्त होती. या जागेसाठी तिरंगी लढत सुरु असून शनिवारी (दि.७) रोजी मतमोजणी होणार आहे. 

started byelection for mundhava at pune | पुणे महापालिकेच्या मुंढव्यातील पोटनिवणुकीला सुरुवात 

पुणे महापालिकेच्या मुंढव्यातील पोटनिवणुकीला सुरुवात 

Next
ठळक मुद्देचंचला कोद्रे यांच्या निधनाने जागा रिक्त झालेल्या जागेवर मतदानास सुरुवात राष्ट्रवादीकडून पूजा कोद्रे तर भाजपकडून सुकन्या गायकवाड, सेनेकडून मोनिका तुपे रिंगणात 

पुणे :दिवंगत माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या चंचला कोद्रे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या   मुंढवा-मगरपट्टा सिटी प्रभाग 22 क या जागेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारी २ पर्यंत संपूर्ण प्रभागात मिळून ३५ टक्के मतदान झाले असून संध्याकाळपर्यंत हा आकडा ६० टक्क्यांच्यापुढे जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे. कोद्रे यांचे १८ डिसेंबर २०१७रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर नियमाप्रमाणे सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक होणे आवश्यक असते. त्यानुसार शुक्रवारी मतदान होत आहे. राष्ट्रवादीकडून दिवंगत कोद्रे यांच्या जाऊबाई पूजा कोद्रे या रिंगणात असून त्यांच्यासमोर भाजपच्या सुकन्या गायकवाड आणि शिवसेनेच्या मोनिका तुपे रिंगणात आहेत. कोद्रे यांच्या घरातील व्यक्ती निवडणूक लढवणार असेल तर उमेदवार देणार नाही असे मनसेने पूर्वीच जाहीर होते. त्यामुळे ही लढत तिरंगी होत आहे.  मुंढवा, मगरपट्टासिटी, माळवाडी, आकाशवाणी, 15 नंबर, लक्ष्मी कॉलनी असा भाग असलेल्या या प्रभागात पुरुष 29 हजार 278 व 26 हजार 436 महिला असे एकूण 55 हजार 714 मतदार आहेत.  सध्या शांततेत पोलीस बंदोबस्तात मतदान सुरु असून कुठल्याही अनुचित प्रकारची नोंद नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

 

 

 

 

 

Web Title: started byelection for mundhava at pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.