टोलवाटोलवी नको; केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत जाहीर करावी- फडणवीस 

By कुणाल गवाणकर | Published: October 19, 2020 11:27 AM2020-10-19T11:27:10+5:302020-10-19T11:30:03+5:30

Devendra Fadnavis: सगळंच केंद्रावर ढकलायचं असेल, तर मग राज्य सरकार कशासाठी?; फडणवीसांचा सवाल

state government should announce help for the farmers first says bjp leader devendra fadnavis | टोलवाटोलवी नको; केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत जाहीर करावी- फडणवीस 

टोलवाटोलवी नको; केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत जाहीर करावी- फडणवीस 

Next

बारामती: अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार राज्याला सहाय्य करेलच. पण राज्य सरकारनं टोलवाटोलवी न करता आधी मदतीची घोषणा करावी, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत द्यावी. सोयीस्कर भूमिका घेऊ नये. सगळंच केंद्रावर ढकलायचं असेल, तर मग राज्य सरकार कशासाठी आहे, त्यांचं काम काय, असे प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी बारामतीत आले असताना फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

'सोयीस्कर राजकीय भूमिका कोणीच घेऊ नये. मदत कशी मिळते हे सगळ्याच नेत्यांना माहिती आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टोलवाटोलवी नको. पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार मदत करेलच. पण पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे राज्यानं तातडीनं मदत करावी. राज्य सरकारनं केंद्राच्या मदतीची वाट बघत राहू नये. ते स्वत: काय करणार ते त्यांनी सांगावं,' असं फडणवीस म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात वाद; गावकऱ्यांना पूल पार करुन यायला सांगितल्यानं नाराजी अन् संताप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याची टीका भाजप नेत्यांकडून वारंवार केली जात आहे. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचा बचाव केला. बाकीचे नेते, मंत्री प्रत्यक्ष फिल्डवर जातील. परिस्थितीचा आढावा घेतील आणि त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली जाईल, अशी कार्यपद्धती आम्ही ठरवली असल्याचं पवार यांनी आज सांगितलं. त्यावर सरकार अपयशी ठरत असल्यानं पवारांना बचाव करावा लागतो, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं.

“मुख्यमंत्री ६ महिन्याने घराबाहेर पडणार ही ब्रेकिंग न्यूज असेल तर महाराष्ट्रासाठी दुसरं दुर्दैव काय”

'शरद पवारांना सरकारला पाठिशी घालावं लागत आहे. या सरकारला पाठिशी घालणं एवढचं काम शरद पवारांकडे आहे. राज्य सरकारविरोधात लोकांमध्ये असंतोष आहे. आमचा दौरा घोषित होईपर्यंत कोणताही पालकमंत्री जिल्ह्याकडे फिरकला नव्हता. आम्ही दौरा करायला लागल्यामुळे सगळेजण आता घराबाहेर पडले आहेत,' असं फडणवीस म्हणाले.

शहाण्याला पुरेसा असतो शब्दांचा मार; शरद पवारांकडून राज्यपालांचा मोजक्या शब्दांत समाचार

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी राज्यातली मंदिरं खुली करण्यावरून मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं खरमरीत पत्र आणि त्यावरून शरद पवारांनी राज्यपालांवर केलेली टीका यावरही फडणवीस यांनी भाष्य केलं. 'राज्यपालांचं एखादं वाक्य आणि त्यावरून वाद होण्याची ही काही पहिली वेळ नाही. राज्यपालांसोबत मतभेद असतील. ते यापुढे होतील. पण आता शेतकऱ्यांना काय मदत मिळणार हे पाहणं गरजेचं आहे, असं फडणवीस पुढे म्हणाले.

Web Title: state government should announce help for the farmers first says bjp leader devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.