राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अजब राजकीय योगायोग! पत्नी महापौर, तर पती विरोधी पक्षनेते

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 02:44 AM2021-03-23T02:44:28+5:302021-03-23T06:03:26+5:30

जळगाव महापालिकेत दोन्ही पदे एकच पक्ष अन् एकाच घरात

Strange political coincidence for the first time in the history of the state! The wife is the mayor, while the husband is the leader of the opposition | राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अजब राजकीय योगायोग! पत्नी महापौर, तर पती विरोधी पक्षनेते

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अजब राजकीय योगायोग! पत्नी महापौर, तर पती विरोधी पक्षनेते

Next

जळगाव : अडीच वर्षातच भाजपची सत्ता खेचून शिवसेनेने महापालिकेवर भगवा फडकवला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या २७ बंडखोर नगरसेवकांच्या जोरावर जयश्री महाजन या शिवसेनेच्या महापौर झाल्या असून, त्यांचे पती सुनील महाजन हे विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरपद पत्नीकडे, तर विरोधी पक्षनेतेपद हे पतीकडे असल्याचा योगायोग जुळून आला आहे. विशेष म्हणजे महापौर व विरोधी पक्षनेतेपद हे एकाच पक्षाकडे आहे.

२०१८मध्ये झालेल्या निवडणुकीत ७५पैकी ५७ जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळवली. शिवसेनेला अवघ्या १५ जागा मिळाल्या होत्या. एमआयएमच्या तीन जागा असल्याने विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेला मिळाले. शिवसेनेचे सुनील महाजन विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका पार पाडत आहेत. बंडखोर नगरसेवकांना अद्यापही स्वतंत्र गट स्थापन करता आलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेकडेच राहिले आहे.

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला कोणत्याही पदाची गरज नाही. महापौर शिवसेनेचा असला तर आम्ही विरोधातच राहू, चुकीच्या कामांना महासभेत विरोध केला जाईल.- भगत बालानी, गटनेते, भाजप

 

Web Title: Strange political coincidence for the first time in the history of the state! The wife is the mayor, while the husband is the leader of the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.