Supriya Sule: राज ठाकरेंच्या राष्ट्रवादीबाबतच्या 'त्या' विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 02:44 PM2021-08-21T14:44:39+5:302021-08-21T14:46:31+5:30

Supriya Sule: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत गेलेल्या विधानानंतर सुरू झालेला वाद काही थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत.

Supriya Sule: Supriya Sule's reaction to Raj Thackeray's statement about NCP, said ... | Supriya Sule: राज ठाकरेंच्या राष्ट्रवादीबाबतच्या 'त्या' विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Supriya Sule: राज ठाकरेंच्या राष्ट्रवादीबाबतच्या 'त्या' विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Next

Supriya Sule: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत गेलेल्या विधानानंतर सुरू झालेला वाद काही थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यातील जातीपातींचं राजकारण वाढल्याचं विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेडकडून राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करण्यात येत आहे. तर मनसेच्या नेत्यांकडूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली जात आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. 

'राज ठाकरेंचं नाव घेताना 10 वेळा विचार करावा, मिटकरीनं तोंड मिटून ठेवावं'

"हे काही दडपशाहीचं सरकार नाही. प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकारी आहे. त्यांच्या बोलण्यानं ते काही खरं होत नाही", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. राज ठाकरेंनी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतच्या विधानावर त्यांना विचारण्यात आलं असता त्या बोलत होत्या. 

राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांनी सांगितला राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाचा अर्थ; भाजपालाही चिमटा

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्रामध्ये जाती पहिल्यापासून होत्या. प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल एक अभिमान होता. तसेच जातीवरती मतदानही व्हायचं आणि ते आजही होतं. मला सध्या सध्या महाराष्ट्रामध्ये असं दिसतं की, लोकांना जातीबद्दल अभिमान हा आहेच, पण दूसऱ्याच्या जातीबद्दलचा द्वेष वाढत गेला आहे. हे महाराष्ट्राच्या एकूण सांस्कृतीला डाग लावणार चित्र आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं.

शरद पवारांच्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज या मूळ विचाराने का होत नाही - राज ठाकरे

तसेच प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान असतो. मात्र दूसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष हा वाटणं, हे कधी महाराष्ट्रात नव्हतं. हे गेल्या २०-२५ वर्षांपासून सुरु झालं. जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या ओळखीचा भाग झाला आहे. महाराष्ट्रात जातीचा मुद्दा हा सर्वांथाने मोठा झाला असेल, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर. कोण जेम्स लेन, कसलं पुस्तक लिहिलं? तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता. बरं तो आता कोण आहे आणि कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणात मराठा समाजाच्या मुलांना, मुलींना, हे कोणी लिहिले तर ब्राम्हणांनी लिहिले मग माळी समाज मग इतर समाज हे सगळं रचलेलं आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.

Web Title: Supriya Sule: Supriya Sule's reaction to Raj Thackeray's statement about NCP, said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.